पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईराजकारणसामाजिक

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर वाय पाटील यांचा आदर्श अभियंता पुरस्काराने शासनाने केला गौरव

मुंबईत बांधकाम मंत्री रविद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रम

शिरूर : ( प्रतिनिधी) :सार्वजनिक बांधकाम विभागाचे ( उत्तर ) कार्यक्षम कार्यकारी अभियंता रावबहादूर यशवंत पाटील यांना शासन सार्वजनिक बांधकाम विभागाचा सन २०२३ चा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देण्यात आला .
मुंबई येथे या राज्यांचे बांधकाम मंत्री रविद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव मनिषा म्हैसकर – पाटणकर, सचिव सदाशिव साळुंखे, सचिव संजय दसपुते यांच्यासह बांधकाम विभागाचे अनेक अधिकारी उपस्थित होते .
मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी कुंटुबातील पाटील यांचे पदविका शासकीय तंत्रनिकेतन सोलापुर,पदवी के आयटी कोल्हापूर व पदव्युतर शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय कराड येथून पूर्ण केले आहे. श्री पाटील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सन २००० मधे सहायक अभियंता श्रेणी-2 या पदावर रुजू झालेले आहेत . तर सन २०१६ पासून कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहे. आंबेगाव मधील शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज ( अवसरी ) ग्रामीण रुग्णालय, मंचर , आदिवासी आश्रमशाळा, वस्तीगृह बांधकाम, भिमाशंकर विकास आराखडा, डिंबे येथील भिमाशंकर उद्यान, घोडनदीवरील अनेक पुलांचे कामे केली .जुन्नर तालुक्या शिवनेरी विकास आराखडा, ओतूर ग्रामीण रुग्णालय, मावळ मधील लोणावळा उपजिल्हा रुग्नालय, कान्हे ग्रामीण रुग्णालय, वडगाव मावळ प्रशासकीय इमारत ,टाकवे, आंबी मोठ्या पुलांचे कामे, बांधकाम खेड तालुक्यात राजगुरू स्मारक विकास आराखडा केला . शिरूर तालुक्यात जगप्रसिद्ध रांजणखळगे पर्यटन विकास आराखडा, ग्रामिण रुग्नालये यासह घोडनदीवरील पुलांचे बांधकाम करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे . सन २०१६ ते २०१२ मध्ये प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत पुणे जिल्यातील अनेक वाड्या वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांचे कामे केले आहेत .

सार्वजनिक बांधकाम क्षेत्रात काम करीत असताना पाटील यांनी महत्वाचे प्रकल्प पुर्ण करण्यात मोठे योगदान दिलेले आहे .
आर वाय पाटील यांना पुरस्कार मिळाल्या बदद्ल त्यांचे अभिनंदन सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील, आमदार दिलीपराव मोहीते पाटील, आमदार सुनिल शेळके, आमदार अतुल बेनके, माजी आमदार पोपटरावजी गावडे, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष पाडुरंग पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता बी एन बहीर यांनी केले आहे .
सोलापुर जिल्हयातील मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी या खेडेगावात जन्मलेले रावबहादुर पाटील यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन पुणे जिल्हयात उत्कृष्ठ काम केले आहे .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page