पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रराजकारणसामाजिक

शिरूरला धनगर समाजाचे आरक्षण आमलबजावणीसाठी रास्ता रोको

सरकार फसवित असल्यांने भावना तिव्र

शिरूर : (प्रतिनिधी )  धनगर समाजांच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करीत वेळ काढूपणा करीत दिशाभुल करणाऱ्या सत्ताधारी मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा निर्धार शिरूर येथे धनगर समाजाने आरक्षण कृती समितीच्या वतीने देण्यात आला .
धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अमलबजावणी करावी या मागणीसह तसेच चौंडी येथे उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्याना पांठिबा देण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने न्हावरे फाटा शिरूर येथे पुणे – नगर महामार्गावर शेळया मेंढ्या सोडुन रास्ता रोको करण्यात आला .
या वेळी माजी नगराध्यक्षा मनिषाताई गावडे ,माजी जिल्हा परीषद सदस्य माऊली ठोंबरे, सेवानिवृत्त अधिकारी चांगदेव पिंगळे, यशवंत सेनेचे अध्यक्ष रामकृष्ण बिडगर, शिरूर तालुका रासपाचे अध्यक्ष शिवाजी कुरहाडे, काळुराम मलगुंडे, घोडगंगाचे संचालक बिरा शेंडगे, प्रभाकर जांभळकर सोनभाऊ मुसळे, कैलास कोकरे ,अशोक कोळपे स्वराज्य बहुजन संघ अध्यक्ष राजाराम दगडे, वैभव कोळपे, कांताराम कांदळकर, सिधु करहे, गोरक्ष तांबे , अँड रतन बिडगर पांडुळे, देविदास पवार, संतोष इंगळे यांच्यासह मोठ्या प्रमानात समाज बांधव उपस्थित होते .
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमधे धनगर समाजाचा समावेश एस टी मधे केला आहे मात्र र चा ड ही स्पेलिंग चुक झाल्यांने गेली ७० वर्षे सरकार समाजावर अन्याय करीत असुन, एस टी च्या सवलती पासुन समाज वंचीत राहीला आहे याला सत्ताधारी लोक जबाबदार असल्यांची टिका आंदोलन कर्त्यानी या वेळी केली .
धनगर समाजाने ज्या ज्या वेळी आंदोलन केले त्या वेळी सत्ताधारी नेत्यांनी आश्वासने देऊन समाजाची फसवणुक केल्याची टिका माजी नगराध्यक्ष मनिषा गावडे, रासपाचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव कुरहाडे यांनी केली .
या वेळी सेवानिवृत्त अधिकारी चांगदेव पिंगळे म्हणाले की , गेली १९ दिवस चोंडीत आंदोलन सुरु असुन, सरकार त्या कडे दुर्लक्ष करीत आहे . सरकारने वेळेत दखल न घेतल्यास तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला .
या वेळी रामकृष्ण बिडगर, माऊली ठोंबरे, अशोक कोळपे, कांताराम कांदळकर, वैभव कोळपे यांचे भाषणे झाली .
या वेळी रस्त्यावर आंदोलनकर्त्यानी शेळया मेंढ्या सोडल्यामुळे पुणे नगर महामार्गावरील वाहतुक काही काळ थांबली होती . पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता . नायब तहसिलदार स्नेहा गिरीगोसावी यांनी धनगर समाजाच्या मागणीचे निवेदन स्विकारले .राज्य सरकार धनगर समाजांच्या मागणी कडे दुर्लक्ष करीत आहे मात्र मुख्यमंत्री कोण करायचे हे धनगर समाजच ठरवतो, धनगर समाजाला फडणविस यांनी फसविले तर त्यांचे मुख्यमंत्री पद गेले त्यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले . त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी प्रश्न मार्गी न लावल्यास माजी होण्यास वेळ लागणार नाही असा इशारा रासपाचे तालुका अध्यक्ष शिवाजी कुरहाडे यांनी दिला .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page