पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईशैक्षणिकसामाजिक

तळेगाव ढमढेरेच्या गुजर प्रशालेत महीला शिक्षिका मधे रंगला मैत्री दिन

महीला शिक्षकांचा फोटो होतोय व्हायरल

तळेगाव ढमढेरे (प्रतिनिधी): निमित्त आहे जागतिक मैत्री दिनचे….. गुजर प्रशालेतील महिला शिक्षिकांनी एकत्र येत एकाच ड्रेसकोड मध्ये एकमेकीच्या हातात धागा बांधत मैत्री दिन साजरा करीत सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो व्हायरल करत मैत्री दिन साजरा केला.
तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील स्वा.सै.आर.बी.गुजर प्रशाला या विद्यालयातील सर्व शिक्षिका एकाच ड्रेस कोडमध्ये एकत्रित येत. एकमेकींच्या हातात धागा बांधत मैत्री दिन साजरा करण्याचा आगळावेगळा आनंद घेतल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
मैत्री एक हवंहवंसं वाटणारं आपुलकीचं नातं. मैत्रीच्या नात्यात कोणतीही बंधन नसतात. जगातील सर्व नात्यांच्या पलीकडे असलेलं मैत्रीचं नातं आयुष्यभर साथ देतं.मैत्रीचे हे बंध एकमेकांशी कधी जुळतात हे कोणालाच कळत नाहीत. अशाच प्रकारे तळेगाव ढमढेरे येथील या शिक्षिकेंना आपले मैत्रीचे नाते कधी घट्ट झाले हे जाणवलेच नाही… आईवडीलांमुळे निर्माण झालेली नाती आपल्याला कुटुंबाकडून मिळतात.प्रेम आणि आपुलकी असलेली रक्ताची ही नाती आपल्याला आयुष्यभर सोबत करतात.पण मैत्रीची नाती काही वेगळीच असतात. हे गुजर प्रशालेतील शिक्षकेंच्या माध्यमातून पाहावयास मिळाले. ऑगस्टचा पहिला रविवार हा जागतिक मैत्री दिन अथवा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो.जागतिक मैत्री दिनाच्या निमित्ताने आपल्या मित्र परिवारासोबत मैत्री या शिक्षिका मैत्रीदिवस साजरा करण्यास विसरल्या नाहीत.
जीवनात अनेक मैत्रिणी येतात जातात.पण अशी एक मैत्रीण असते ती आपल्या हृदयात
घर करून राहिलेली असते,
आणि ती मैत्रीण माझ्यासाठी तूच आहे.मैत्री हसवणारी असावी
मैत्री चिडवणारी असावी.
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी.एक वेळेस ती भांडणारी असावी.पण कधीच बदलणारी नसावी.मैत्री म्हणजे थोडं घेणं….
मैत्री म्हणजे खूप देणं…मैत्री म्हणजे देता देता समोरच्याच होऊन जाणं… तळेगाव ढमढेरे गुजर प्रशालेतील शिक्षकांनी एकत्र येत खेळीमेळीच्या वातावरणात मैत्री दिन साजरा केला.

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page