पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईराजकारणशैक्षणिकसामाजिक

राज्यात जे राजकारण घडले त्यांची चिंता तुम्ही करू नका – आम्ही शरद पवार साहेबांच्याच मार्गदनाखाली काम करतोय – दिलीप वळसे पाटील

शिरूर तालुक्यात वळसे पाटील यांचे जोरदार स्वागत

शिरूर : राज्यात जे राजकारण झाले त्यांची चिंता तुम्ही करू नका मार्ग निघेल आता आम्ही  जेष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शना खाली शेतकर्यांचचे प्रश्न सोडविण्यांचे काम करू असे सुचक विधान सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी केले .
मोराची चिंचोली ता शिरूर येथे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे भुमिपुजन करण्यात आले . या वेळी पुणे जिल्हा दुध संघाच्या माजी अध्यक्ष केशरताई पवार,शिरूर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पांचुदकर, माजी सभापती प्रकाश पवार, जिल्हा परीषदेच्या माजी सभापती सुनिता गावडे,जिल्हा परीषद सदस्या स्वातीताई पांचुदकर, भिमाशंकर सहकारी साखर कारखाण्यांचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, उपसभापती सविता परहाड , माजी सभापती आबासाहेब कोहकडे, उदयोजक सदाशिव पवार, तहशिलदार बाळासाहेब म्हस्के, गटविकास अधिकारी महेश डोके, अतिरीक्त पोलिस अधिक्षक मितेश गट्टे, पोलिस अधिकारी यशवंत गवारी , घोडगंगाचे संचालक सुहास  थोरात,सरपंच हौसाबाई नाणेकर, कार्यकारी अभियंता ( जलजीवन ) अर्जुन नारगौडा चेअरमन आरती नाणेकर, सरपंच संतोष भरणे ,अँन्ड देवराम धुमाळ , माजी सरपंच रुपाली धुमाळ, माजी सरपंच नलिनी खर्डे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते .
सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील म्हणाले की, सत्ता पद महत्वाचे नसते तर त्यामधुन सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडविणे  महत्वाचे असते . डिंबा कालव्यांच्या तळा मधुन बोगदा काढण्याचा जो प्रयत्न सुरु होता तो झाला असता तर घोड कुकडी मिना या नदया वरील ६५ बंधारे कोरडे पडले असते . पुन्हा  १९७२ चा दुष्काळ  आठवला असता . आता सरकार मधे आल्यांने या बाबत नक्कीच सकारत्मक निर्णय घेण्यात येईल .
माझ्या मागे ईडी सीडी लागलेली नाही, जे करतो ते उजळ माथ्याने करतो असे सांगत जे करतो ते विकासासाठीच करीत असल्यांचे प्रतिपादन त्यांनी केले .
सहकार मंत्री झाल्यानंतर दिलीपराव वळसे पाटील यांचा शिरूर तालुक्यात प्रथम जाहीर दौरा असल्यामुळे परिसरातील आणि गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page