शिरूर (वृत्तसेवा ) : पुणे जिल्ह्यातील नावाजलेल्या जिजामाता महिला सहकारी बँकेच्या सेवक प्रतिनिधी संचालक पदी दहिवडी ता शिरूर येथील संदीप ज्ञानेश्वर कोकरे व भांबर्डे येथील मंगेश पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे .
बँक कर्मचारी संघाचे अध्यक्ष गिरीष मेगे व जनरल सेक्रेटरी राघवेंद्र मानकर यांनी कोकरे व पवार यांच्या शिफारशीचा ठराव जिजामाता महिला सहकारी बँकेकडे पाठविण्यात आला होता . त्यानुसार संचालक मंडळाने हि निवड केली आहे .
सहकार कायद्यांच्या नवीन तरतुदीनुसार कार्यलक्षी संचालक म्हणुन सेवक प्रतिनिधीची निवड केली जाते . यंदा प्रथमच दोन संचालक निवडण्यात आले आहे .हि निवड २०२८ पर्यन्त आहे . संचालक पदी वर्णी लागण्यासाठी अनेकांनी फिल्डींग लावली होती . त्यात कोकरे यांनी बाजी मारली . कोकरे व पवार यांच्या रुपाने संचालक मंडळात शिरूरकरांची भर पडत नऊ संचालक झाले आहे .
या निवडी बद्दल कोकरे म्हणाले की बॅक अधिक सक्षम होण्यासाठी सभासद व सेवक यांना विश्वासात घेऊन त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले जातील .
या निवडी बद्दल माजी आमदार पोपटराव गावडे, बॅकेच्या अध्यक्षा रत्नमाला म्हस्के व उपाध्यक्षा सुरेखा शितोळे, व्यवस्थापकीय संचालक उमाकांत मुंगी , माजी नगरसेवक अनिल जाधव, संचालक जाकीरखान पठाण , आबाराजे मांढरे, रेखाताई बांदल, राजेंद्र उमाप यांच्यासह संचालक मंडळाने यांनी त्यांचे अभिनंदन केले .