पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईसामाजिक

विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या माध्यमातुन कवठे येमाई परीसरातील जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळेल – माजी आमदार पोपटराव गावडे

कवठे येमाई येथे डॉ शुभम बारहाते यांच्या हॉस्पिटलचे उद्घाटन

कवठे येमाई (वृत्तसेवा ) : आरोग्य सेवा हिच खरी इश्वर सेवा असुन, विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या माध्यमामधुन कवठे येमाई परीसरातील नागरीकांना उत्तम आरोग्य सेवा डॉ शुभम पोपटराव बारहाते देतील असा विश्वास शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केले .
कवठे येमाई ता शिरुर येथे डॉ शुभम पोपटराव बारहाते व पुजा शुभम बारहाते यांनी सुरु केलेल्या विघ्नहर्ता हॉस्पिटलचे उद्घाटन शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते झाले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष, जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंगजी पवार होते . या वेळी घोडगंगाचे माजी संचालक राजेंद्रदादा गावडे, पंचायत समिती समितीचे माजी उपसभापती बाळशिराम ढोमे, सदस्य डॉ सुभाष पोकळे, सदस्या तया सरपंच अरुणाताई घोडे, वासुदेव जोरी,जीवन मित्र मेडीकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ हिरामण चोरे, जिल्हा कृषी अधिकारी संजय पिंगट, सेवानिवृत्त अधिकारी प्रभाकर गावडे, डॉ दत्तात्रय डुकरे, डॉ श्रीकांत फलके, डॉ संतोष उचाळे, डॉ भरत सोदक, जांबुतचे सरपंच दत्तात्रय जोरी, माजी सरपंच बाळकृष्ण कड,बाळासाहेब फिरोदिया,बाबाशेठ फिरोदिया, माजी सरपंच बबनराव पोकळे, बाजार समितीचे माजी संचालक सावित्राशेठ थोरात, डॉ प्रकाश उचाळे, केंद्रप्रमुख पी सी बारहाते, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संतोष थोपटे, शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष म्हतारबा बारहाते, कवठे येमाईचे उपसरपंच विठ्ठल मुंजाळ, उदयोजक बापुसाहेब साबळे, माजी सरपंच रामदास सांडभोर,माजी सरपंच दिपक दुडे पाटील, चेअरमन किरण ढोमे ,डॉ हेमंत पवार,देविदास पवार,शहाजी सोदक यांच्यासह मोठ्या प्रमानात ग्रामस्थ उपस्थित होते .सुत्रसंचालन लहु साबळे यांनी तर आभार डॉ शुभम बारहाते यांनी मानले .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page