पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रराजकारण

पिंपरी चिंचवड भाजपामध्ये फूट पडण्याची शक्यता ; शहराध्यक्ष पदावरून पक्षात नाराजीचा सूर

कोण होणार शहराध्यक्ष या कडे लागले लक्ष

पिंपरी चिंचवड (वृत्तसेवा ) ः पिंपरी चिंचवड शहर भाजपचे विद्यमान अध्यक्ष व भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांचा कार्यकाळ संपला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या धोरणात्मक निर्णयानुसार अनेक जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पिंपरी चिंचवडचे अध्यक्षही बदलले जाऊ शकतात. त्याची चाचपणी करण्यासाठी शुक्रवारी (ता.१२ मे) पक्ष निरिक्षक शहरात येत आहेत. मात्र, इच्छुकांपैकी शंकर जगताप यांच्या नावाला टोकाचा विरोध दिसत आहे. जगताप यांची निवड झाल्यास पक्षातील एक मोठा गट भाजपमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे, असे कळते.
अध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावल्या आहेत. कारण, भाजपमध्ये संघटनेला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे शहरात कोणाला संधी मिळणार, या बाबत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह भाजप परिवारातील दिग्गजांच्याही नजरा लागल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे शहर अध्यक्ष कोण होणार? , हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नुकतेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पिंपरी-चिंचवड शहर संघटनेचा आढावा घेतला. त्यामध्ये शहर संघटनेच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.
सद्यःस्थितीला शहरातून सचीन पटवर्धन, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी शंकर जगताप , महापालिकेतील माजी सभागृह नेता नामदेव ढाके आणि विद्यमान संघटन सरचिटणीस अमोल थोरात अशी नावे प्रमुख नावे चर्चेत आहेत.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार लांडगे यांनी राष्ट्रवादीच्या हातातील सत्ता खेचून आणली. राष्ट्रवादी काँग्रेस व पवार कुटुंबीयांशी थेटपणे दोन हात करून भाजपचा झेंडा पुन्हा फडकवण्यासाठी लांडगे यांना शहराध्यक्षपदी मुदतवाढ मिळावी, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. परंतु, आमदार लांडगे यांना राज्यात मंत्रिपदावर संधी मिळण्याबाबत चर्चा असून, त्यांच्याकडे मोठी जबाबदारी मिळू शकते

सदाशिव खाडे यांनी शहराध्यक्ष पद चांगल्या रीतीने सांभाळले होते. शहरातले गट-तट योग्यरीतीने सांभाळत पक्षाची धुरा सांभाळली होती. तसेच सचिन पटवर्धन यांचे राज्य पक्ष कार्यकरणी सोबत असलेल्या संबधामुळे चांगल्या प्रकारे कार्य करू शकतात.

शहर भाजपमध्ये जुना निष्ठावंत, जगताप गट, लांडगे गट अशी विभागणी आहे. जगताप समर्थकांमध्ये आमदार अश्विनी जगताप आणि शंकर जगताप असे पोटगट आहेत. त्यामुळे शंकर जगताप यांचे नाव जास्त चर्चेत आहे. परंतु, आमदारकी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशी दोन पदे जगताप यांच्याच घरात असल्याने आता शहराध्यक्ष पदही त्यांच्याच घरात देण्यास पक्षातूनच या घराणेशाहीला विरोध विरोध होऊ लागला आहे.
जगताप गटाचे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनाही शहराध्यक्षपदाची महत्त्वाकांक्षा आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत काटे यांच्या प्रभागात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतांची आघाडी घेण्यापासून रोखण्यात आले. शहराध्यक्षपदी संधी मिळाल्यास २०२४ मध्ये शत्रुघ्न काटे विधानसभा निवडणुकीसाठी ‘दावेदार’ होऊ शकतात. त्यामुळे अश्विनी जगताप, शंकर जगताप अशी रस्सीखेच पक्षास परवडणारी नाही, असे मत जुन्या निष्टावंत गटाचे आहे. यामुळे शंकर जगताप शहरअध्यक्ष पदी नियुक्ती केल्यास जुना गट पक्षातून बाहेर पडणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते.
भाजप हा केडर पक्ष आहे. दहा पंधरा वर्षांत चिंचवड मतदार संघात पर्यायी नेतृत्व उभे राहू शकले नाही याची खदखद कार्यकर्त्यांत आहे. त्यामुळेच जगताप यांना होणारा विरोध उद्या कसबा विधानसभा पोट निवडणुकीसारखा पक्षाच्या विरोधात जाऊ शकतो.

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page