तळेगाव दाभाडे ( वृत्तसेवा ): तळेगाव दाभाडे ( ता मावळ जि पुणे ) येथील जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशार आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. हल्या नंतर त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोरांनी अचानक हल्ला केल्याने परिसरात एकच धावपळ उडाली होती.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर खूनी हल्ला हल्ला केला. त्यापैकी दोघाजणांनी गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वार केले. हल्ला केल्यानंतर हललेखोर त्याच ठिकाणी काही वेळ थांबून होते.
आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते. जखमी अवस्थेतील आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राजकीय वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून आवारे या हल्यात गंभीर जखमी झाले आहेत.घटनेनंतर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.