पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रसामाजिक
शिरूर तालुक्यात दि १२ रोजी फेरफार अदालत होणार ..
तालुक्यात महाराजस्व अभियान अंतर्गत महसुल प्रशासन प्रलंबित कामे लावणार मार्गी
टाकळी हाजी : ( वृत्तसेवा ) शिरुर तालुक्यात महास्वराज अभियान दिनांक १२ एप्रिल रोजी राबविण्यात येणान असुन या अंतर्गत मंडलनिहाय फेरफार आदालत,नोंदी, व विध्यार्थी शैक्षणिक दाखले ,महसुल संदर्भात कामे मार्गी लावण्यात येणार असल्यांची माहीती तहशिलदार बालाजी सोमवंशी यांनी दिली आहे .
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणेसाठी महाराजस्व अभियान राबविणेचा निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने ई-फेरफार प्रणालीमध्ये नोंदणीकृत व अनोंदणीकृत साध्या नोंदी १ महिन्यापेक्षा अधिक कालावधीसाठी आणि विवादग्रस्त नोंदी ३ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी सबळ कारणाशिवाय प्रलंबित राहणार नाहीत या करीता तहसिल व मंडळ स्तरावर फेरफार अदालत आयोजित करणेबाबत उक्त शासन निर्णया द्वारे निर्देश देण्यात आलेले आहेत..
फेरफार अदालत बुधवार, दि. १२/४/२०२३ रोजी घेणेबाबत निर्देश दिलेले आहेत. प्रस्तुत निर्देशांचे अनुषंगाने तहसिल कार्यालय शिरुर अंतर्गत बुधवार, दि. १२/४/२०२३ रोजी सकाळी ९.३० वाजलेपासून खालीलप्रमाणे फेरफार अदालतींचे आयोजन करणेत आलेले आहे.
मंडल व कंसात ठिकान दिलेले आहे .
शिरूर , रांजणगाव गणपती – ( तहशिल कार्यालय शिरूर मिंटीग हॉल )
मलठण , टाकळी हाजी – ( मंडल अधिकारी कार्यालय मलठण )
तळेगाव ढमढेरे कोरेगाव भिमा – ( ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे )
न्हावरे वडगाव रासाई – ( वडगाव रासाई )
पाबळ – (पाबळ) येथे होणार आहे .
वरील फेरफार अदालत कार्यक्रमामध्ये ७/१२ वरील त्रुटी दुरुस्तीची प्रकरणे दाखल करुन घेणे, संजय गांधी योजना अंतर्गत उत्पन्न दाखले वितरीत करणे व अर्ज स्विकारणे,विदयार्थ्यांना शैक्षणिक कामकाजासाठी उत्पन्नाचे दाखल वितरीत करणे इत्यादी कामकाज करण्यात येणार आहे. तसेच हरकत नोंदीवर प्राप्त आक्षेपांचे अनुषंगाने सूनावणी घेवून निर्णय देणे व प्रलंबित फेरफार नोंदी निर्गत करुन त्याच दिवशी ७/१२ व फेरफार वितरीत करणे असे कामकाज करणेत येणार आहे. तरी वरीलप्रमाणे पार पडणा-या फेरफार अदालतीस नागरीकांनी उपस्थित राहून सदर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन उपविभागिय अधिकारी स्नेहा किसवे देवकाते, तहशिलदार बालाजी सोमवंशी, तहसिलदार यांनी नागरीकांना केलेले आहे. तसेच वरील फेरफार अदालत कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी पुणे, तहसिलदार शिरुर, सर्व नायब तहसिलदार शिरुर हे उपस्थित राहणार आहेत.