पारनेर (वृत्तसेवा ) : अहनदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात काही गावात गारपिट वादळ वाऱ्यासह मोठ्या प्रमानात अवकाळी पावसाने थैमान घालीत शेती व घरादारांचे नुकसान झाल्यांचे कळताच पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी सकाळी सहा वाजताचं या गावांकडे धाव घेत शेतकऱ्यांना आधार देत तत्काळ नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे .
सध्या शेतकरी शेत पीकांच्या काढण्यात व्यस्त असतांनाच अचानक शनिवार ,रविवार या दोन दिवसात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून या अवकाळी पावसाने पारनेर तालुक्यातील वनकुटे,पळशी,खडकवाडी क्षेत्रातील अनेक गावांमध्ये गारपीट व अतिवृष्टीने अचानक धुमाकूळ घातला. यात अनेक शेतकऱ्यांचे, नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे . त्यामुळे शेतकरी हतबल झाला असुन याबाबत कार्यकर्त्यानी आमदार निलेश लंके यांना सविस्तर माहीती देताच भल्या पहाटे आमदार सर्व नियोजित कार्यक्रम थांबवित थेट शेतकऱ्यांला धिर देण्यासाठी बांधावर पोहचले . त्यांनी शेतकऱ्या कडुन सर्व माहीती घेत कांदा पिके, पडलेले घरे यांची पाहणी केली . तत्काळ तहशिलदार यांना माहीती देत पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या आहेत .
सर्वसामान्य कार्ये कर्त्याच्या सुख दुःखात सहभागी होणारे आमदार म्हणुन निलेश लंके यांच्या नावाची मोठी चर्चा नेहमीच असते त्यांच बरोबर आपल्या मतदार संघातील सामान्य माणसांशी त्यांची नाळ घट्ठ असल्यांची प्रचिती या घटनेने आले असुन, राज्यातील इतर आमदार खासदार यांनीही लंके यांच्या कामाचा आदर्श घ्यावा अशी चर्चा कार्यकर्ते करीत आहेत .