गुन्हेपुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईराजकारण

टाकळी हाजीतील खोट्या पंचानाम्याचा होणार का पर्दाफास ..

ग्रामपंचायत सदस्याला अतिक्रमणातुन वाचविण्यासाठी सुरु आहे खटाटोप

टाकळी हाजी : साबळेवाडी ।( टाकळी हाजी ) शिरूर  येथील गावठाण मध्ये एका ग्रामपंचायत सदस्याचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले असून त्याला वाचवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामपंचायतचे सत्ताधारी काम करीत असून खरोखर त्याच्या नावाचा पंचनामा करून अतिक्रमण काढले जाणार का याच्याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे .

  टाकळी हाजी तालुका शिरूर येथील साबळेवाडी गावठाण हद्दीमध्ये सव्वा सहा एकर जमीन गेली अनेक वर्ष येथील काही शेतकरी गावठाण हद्द तेथील स्मशानभूमी परिसर सपाट करून शेती करीत आहेत .अनेकांनी या ठिकाणी कांदे, डाळिंबाची शेती केली आहे .या डाळिंबाच्या शेतीमध्ये एका ग्रामपंचायत सदस्याचा समावेश असून स्वतःला वाचवण्यासाठी हा ग्रामपंचायत सदस्य इतर लोकांच्या नावाने ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी व सत्ताधारी मंडळी पंचनामा करून लोकांची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत.
स्वतःच्या जवळचे लोक पंचनाम्याला उभे करून स्वतः ऐवजी दुसऱ्या पंटरच्या नावाने पंचनामा दाखविण्यात येत आहे . गेली चार दिवस येथील युवा कार्यकर्ते संतोष मोहन साबळे हे अमरण उपोषणाला बसले  असून त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे . ग्रामपंचायत सदस्याला वाचवण्यासाठी गेली तीन दिवस गावातील सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरू असून त्यामुळे हे अपंग उपोषणकर्त्याचा जीव मात्र धोक्यात आला आहे .शिरूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तहसीलदार यांनी समक्ष येऊन खरे पंचनामे करण्यात करावे तसेच अतिक्रमण काढून अतिक्रमणधारकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी श्री संतोष मोहन साबळे यांनी केले आहे.

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page