गुन्हेपुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रशैक्षणिक

कुटुंबासमवेत नवीन इमारती पाहण्यासाठी गेली…! फोन आला अन् घडली दुर्घटना

सासवड येथे इमारतीवरून पडुन तरुणीचा झा मृत्यु

पुणे: ( वृत्तसेवा ) :पुणे जिल्ह्याच्या सासवड येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. सासवड येथील बांधकाम व्यवसायिक सुनील नाना जगताप यांच्या मुलगी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडुन तिचा दुर्देवी अंत झाला आहे. नवीन इमारतीची पाहणी करण्यासाठी सर्व कुटुंबासोबत आली होती मात्र फोन आला म्हणून घेण्यासाठी गडबडीत गेली आणि ती खाली कोसळली. या घटनेने सासवड परिसरात.खळबळ उडाली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.

अनुष्का जगताप ( वय २१) असे मृत झालेल्या  तरुणीचे नाव आहे. २ एप्रिल रोजी ही घटना घडली असून फोन घण्यसाठी गेली आणि इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडली. त्यानंतर तिला उपचारासाठी तिला पुण्याच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर मार लागल्याने तिचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सासवड परिसरात जगताप हे बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहे. २ एप्रिल रोजी ते आपल्या कुटुंबीयांसोबत आपल्या नवीन बांधलेल्या इमारतीची पाहणी.करण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत अनुष्का देखील गेली होती. मात्र फोन आला म्हणून ती गडबडीत खाली येत असताना ती पडली. त्यात तिला.गंभीर दुखापत झाली होती. तिला उपचारासाठी पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करन्यात आले होते. मात्र गंभीर मार लागल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

अनुष्काने सासवडच्या वाघिरे महाविद्यालयातून बीएसस्सी पदविका पूर्ण केली होती. तिच्या निधनाने सासवडसह त्यांच्या मूळ गावात ताथेवाडी येथे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक शरद जगताप यांची अनुष्का पुतणी होती. अनुष्काच्या निधनाने तिच्या मित्र परिवारात दुःख पसरले असून सर्वांना धक्का बसला आहे.

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page