पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईराजकारण
Trending

जेष्ठ नेत्या जयश्रीताई पलांडे यांचा भाजपात प्रवेश, शिरूर तालुक्यात भाजपला मिळणार बळ

जयश्री पलांडे पुणे जिल्ह्यातील आहेत मोठ्या नेत्या

शिक्रापूर ( वृत्तसेवा ) :पुणे जिल्हा बँकेच्या माजी उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पलांडे (jayshritai palande) यांनी त्यांच्या समर्थकानसह शिवसेना उद्धव ठाकरे गटाचीच साथ सोडत मंगळवारी दिनांक पाच जानेवारी रोजी मुंबई येथे भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थिथितीत प्रवेश केला.
ठाकरे गटाचे शाखा प्रमुख विविध गावचे सरपंच उपसरपंच व अनेक कार्यकर्त्यानी या वेळी भाजपात प्रवेश केला.पलांडे यांच्या समवेत उपजिल्हाप्रमुख रवींद्र गायकवाड , तालुका संघटक समाधान डोके ,गोरक्ष काळे ,माऊली साकोरे ,उपतालुका प्रमुख बापूसाहेब मासळकर, तालुका सरचिटनीस वैभव पलांडे ,हेमंत नीलख, दादा वाजे, पाबळचे सरपंच मारुती शेळके, सादलगावच्या सरपंच छबुताई केसवड, आदींनी भाजपात प्रवेश केला.

   यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की ,म्हणाले की ठाकरे पिता-पुत्रांनी सत्ता ही साध्य म्हणून वापरली. त्यांनी हिंदुत्वाचा त्याग केल्याने अनेक शिवसैनिकांनी त्यांची साथ सोडली आहे. लवकरच शिल्लक सेना ही किंचित सेना झालेली दिसेल.या पक्षात जुने नवे असा भेद नाही. शिरूर आंबेगाव खेड तालुक्यात भाजपाला बळ मिळाले आहे. पुढील काही दिवसांत पक्ष प्रवेशाचा बॉम्ब फुटणार आहे. शिरूर लोकसभा मतदार संघात लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे , माजी परीषद सदस्य आशाताई बुचके, अतुल देशमुख तालुकाप्रमुख आबासाहेब सोनवणे ,ललित नहार, केशव , रोहित खैरे , श्रीकांत सातपुते , जयरा शिंदे ,आरपीआयचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे आदी उपस्थित होते . शिरूरचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या निधना नंतर तालुक्यात भाजप नेतृत्वा मधे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यात भाजपला पलांडे यांच्या प्रवेशाने यश मिळाले आहे . पलांडे या मुळच्या भाजपचच असुन सन -२००४ मधे त्यांनी उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता . तत्कालिन जेष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे समर्थक म्हणुन त्यांची  जिल्ह्यात  ओळख होती . शिरूर आंबेगाव तसेच शिरूर-हवेली या दोन्ही विधानसभा मतदार संघात पलांडे यांना मानणारा मोठा वर्ग एक  लढावय्या नेत्या म्हणुन पलांडे यांची ओळख आहे .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page