टाकळी हाजी : ( प्रतिनिधी ) : शिरूर ( जि पुणे ) तालुक्यातील बेट भागातील टाकळी हाजी कवठे संविदणे परीसरात मोठ्या वादळ वाऱ्यासह गारपीट झाल्यांने प्रचंड नुकसान झाले आहे .
प्रचंड वाऱ्यासह अचानक गारपीट सुरु झाली . यामधे अनेक ठिकानी विजेचे खांब पडले असुन डांळीब बाग कांदा रोपे, भाजीपाला पिके यांचे प्रचंड नुकसान झाले आहे . सध्या शेतकरी कांदा लावगडीसाठी रोपाची तयारी करीत होते हे रोपे पुर्णपणे गारांच्या मारामुळे भुईसपाट झाले आहे . मोठी मेहनत करून फुलविलेल्या डांळीबाच्या कळ्याचा सडा जमीनीवर पडला आहे . टाकळी हाजी , कुंड परीसर, सोदक वस्ती, रोहीलेवाडी, माळवाडी परीसरात गारांचा वेग मोठ्या प्रमानात होता प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले असुन शेतीचे सर्रास पंचनामे करून बेटभागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी युवानेते राजेंद्रदादा गावडे यांनी केली आहे .
हातातोंडाशी आलेला घास गारपीटीमुळे निसर्गाने हिराऊन घेतला असुन, कांद्यांचे गेली दोन वर्ष होत असलेले नुकसान या मुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकर्याला या निसर्गाच्या तडाक्यांने जबर धक्का बसला आहे . या बाबत उपविभागिय प्रांत अधिकारी स्नेहल देवकाते – किसवे व तहशिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना मंडल अधिकारी तलाठी यांना दिले आहेत .