महाराष्ट्रमुंबईराजकारण

जेष्ठ नेते शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेने राजकीय मोठी खळबळ

तीन दिवसात फेरविचार करणार - शरद पवार

मुंबई (वृत्तसेवा ) :
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबई येथे अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यामुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे .
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या लोकमाझा सांगती या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन मुंबई येथे मंगळवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आले होते . या कार्यक्रमात भाषण करीत असताना अचानक शरद पवार यांनी पक्ष्याध्यक्षपदाच्या राजीनामा देण्याची घोषणा करीत ,मी यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करीत मोठा राजकीय भूकंप घडवला. मात्र मी यापुढे सार्वजनिक जीवनात कार्यरत राहणार असल्याचे पवार यांनी आवर्जून सांगितले. पवार यांच्या या वक्तव्याने या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले अनेक कार्यकर्ते व नेते यांनी पवारांना घेराव घालत त्यांचे अश्रू अनावर झाले होते. यावेळी पवार साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा म्हणून कार्यकर्ते जोरदार घोषणा करीत यशवंतराव चव्हाण भवनात गोंधळ घातला . विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करीत शांत राहण्याचे आवाहन केले . यावेळी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल जयंत पाटील, सुप्रिया सुळे, दिलीपराव वळसे पाटील, छगन भुजबळ, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, राजेश टोपे यांच्यासह राज्यातील अनेक आमदार खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते .
राज्याच्या व देशाच्या राजकारणामध्ये 1960 पासून कार्यरत असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अचानक राजीनामामुळे त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते नेते यांच्याबरोबरचं सामान्य माणसालाही धक्का बसला आहे .सध्या देशात सर्व क्षेत्राचा अभ्यास असणारे व सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणारे नेतृत्व म्हणजे शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते . विरोधी पक्षात सुद्धा त्यांच्या इतका राजकीय सामाजिक अभ्यास असणारा नेता नसल्याने राज्य व देशातील जनता शरद पवार यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत .देशातील शेतकरी कामगार वर्गाची सध्या मोठ्या प्रमाणात शोषण होत असून मोठ्या आर्थिक अडचणीतून हा घटक जात आहे महाराष्ट्र व देशांमध्ये शेती व शेतीवर आधारित काम करणारे कुटुंब लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून या घटकाला न्याय देण्याचे काम सातत्याने शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात केल्याने त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी लाखो लोक आहेत .
राज्याच्या व देशाच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असून शरद पवार यांच्या या राजकीय खेळीने राजकारणात दडलय काय असा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण झाला आहे . पवार साहेब यांच्या राजीनाम् नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख शरद पवार हीच असून नव्या अध्यक्षाला मोठे आव्हान निर्माण होणार आहे .

शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा – पोपटराव गावडे माजी आमदार ) :
राज्यात व देशांमध्ये शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाची सध्या गरज असून महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी दिल्लीलाही हादरा देणारा हा एकमेव नेता आहे . त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी शेतकरी कामगार दलित शोषित वर्गाला न्याय देण्यासाठी पवार साहेबांच्या नेतृत्वाची पक्षाला व राज्याला अत्यंत गरज आहे . साहेबांनी राजीनामा मागे घेऊन मागे घ्यावा अशी मागणी शरद पवार यांचे ज्येष्ठ सहकारी शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केले आहे .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page