Uncategorizedपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईराजकारण
शरद पवारांच्या एका फोनमुळे झाली मोदीची सभा रद्द अन् माझा विजय हुकला
पुणे येथे महादेव जानकर यांनी केला खळबळजनक खुलासा

पुणे : ( वृत्तसेवा ) : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या एका फोनमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामती येथे माझ्या लोकसभा निवडणूक प्रचारार्थ होणारी सभा रद्द केल्यामुळेच माझा पराभव झाला असा खुलासा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पुणे येथे केला .
सन २०१४ मधे बारामती लोकसभा मतदार संघामधुन खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात महादेव जानकर यांनी जोरदार लढत देत त्यांचा ६९ हजार ६६६ मतांनी सुळे यांनी पराभव केला . सुळे यांना ५ लाख २१ हजार ५६२ तर जानकर यांना ४ लाख ५१ हजार ८४३ मते मिळाली होती . त्यामुळे मोदीनी सभा घेतली असती तर विजय नक्कीचं मिळाला असता असे जानकर म्हणाले राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुणे (टिळकरोड ), मराठा चेंबर ऑफ कॉमर्स सभागृहामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या निमित्ताने सत्कार समारंभ व पक्षनिधी सुपर्द कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते .
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव माऊली सलगर , प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब कोकरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने, पश्चिम समन्वयक सचिन गुरव ,युवक अध्यक्ष अजित पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोफणे, पुणे जिल्हा शहर विभाग जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर, महिला जिल्हाध्यक्ष सुनिता किरवे, उपाध्यक्ष वैशाली जाधव,शहराध्यक्ष बालाजी पवार, शिरूर लोकसभा अध्यक्ष रामकृष्ण बिडगर, लक्ष्मण ठोंबरे ,अंकुरा देवडकर, बाळासाहेब कोकरे, युवती शहराध्यक्ष शामली कसबे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले की, बारामती, परभणी, म्हाडा यांच बरोबर उत्तरप्रदेश ( मुज्जफरपुर ) असे लोकसभेला माझ्या समोर चार पर्याय असुन या पैकी मी कोठुनही निवडणुकीला उभा राहु शकतो . विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपाने सोबत घेतले तर ठिक अन्यथा इतर पर्याय पक्षाला आहेत असा इशाराही त्यांनी देत स्वबळाचा नारा दिला . राज्यात १० ते १५ आमदार रासपाची निवडुण येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .महाराष्ट्र बाहेरही पक्षाची ताकद चांगल्या प्रकारे वाढत असून कार्यकर्त्यांनी तळागाळात जाऊन सर्वसामान्य माणसाला रासपाची ध्येय धोरणे सांगावीत असे आवाहन त्यांनी केले .
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते म्हणाले की, तरुण वर्गाला रासपा मधे सामिल करून घेण्याचे काम झाले पाहीजे . या वेळी राष्ट्रीय महासचिव माऊली सलगर, युवक अध्यक्ष अजित पाटील यांचे भाषणे झाली . स्वागत शहराध्यक्ष बालाजी पवार तर आभार महिला शहर अध्यक्षा सुनिता किरवे यांनी मानले .