गुन्हेपुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबई

चोरी गेलेल्या चार स्विफ्ट कार पोलिसांनी चैन्नई येथुन केल्या जप्त, चार आंतरराज्य चोर गजाआड

पुणे ग्रामिण पोलिसांची धडाकेबाज कारवाई, एका महीन्यात ५० मोटार सायकलचाही लावला शोध

शिरूर (वृत्तसेवा ) : गेली महिन्यात शिरूर शहरातून स्विफ्ट व डिझायर कार चोरी जावून एकूण पाच गुन्हे दाखल झाले होते. अचानक सुरू झालेल्या या कार चोरीच्या सत्रात, फक्त स्विफ्ट व डिझायर कार चोरी जात असल्याचे निदर्शनास आले. पुणे ग्रामिणचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी सदरचे कार चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्या बाबत स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांना सुचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्वतः लक्ष देवून शिरूर विभागाचे कामकाज पाहणारे तपास पथकाला दाखल गुन्हयांचा सखोल तपास करून गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले असता सर्व चोरी गेलेली वाहने ही अहमदनगर मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्याने निष्पन्न झाले.

पोलीस नेहमी गुन्हा घडलेनंतर चोरी करणारे चोरांचा शोध घेतात व मुद्देमाल हस्तगत करतात. परंतु यावेळी पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी मार्गदर्शन व सुचना करून चोरीच्या गाडया कोणत्या राज्यात आहेत. याबाबत त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळविली असता चोरी गेलेली वाहने तामिळनाडु राज्यातील चेन्नई शहरात असल्याची माहिती मिळाल्याने शिरूर विभागाचे तपास पथक चैन्नई येथे पाठवून इसम नामे १) राजा कल्याण सुंदराम रा पावेदसराई मासई नगर तांबरम चैन्नई, २) रविंद्रम गोपीनाथम रा. नॉर्थ पोलीस क्वॉर्टर, वेल्लूर, ३) यादवराज शक्तीवेल रा. गांधी स्ट्रीट मुदीचूर तांबरम चैन्नई यांना ताब्यात घेवून एक डिझायर कार हस्तगत केली. त्यांचेकडे मिळून आलेली कार ४) आर सुधाकरण रा. वेंडलूरू, कांचीपुरम चैन्नई याने दिली होती, त्या इसमास पुणे ग्रामीण पोलीस चैन्नई मध्ये असलेबाबत चाहूल लागल्याने तो चैन्नई सोडून गेला असल्याचे समजले. गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे इसम नामे आर सुधाकरण यास शाहगढ जालना परीसरातून ताब्यात घेवून त्याचे कडे तपास केला असता, त्याने मागील चार महिन्यात एकूण दहा गाड्या खरेदी केल्या असल्याचे सांगितले, त्यास विश्वासात घेवून त्याचे मार्फत तीन चारचाकी वाहने हस्तगत केली आहेत. चैन्नई परीसरात विक्री केलेल्या चार कार एकूण तीस लाख रूपये किमतीच्या त्यामध्ये दोन स्विफ्ट, दोन डिझायर कार हस्तगत करून शिरूर पो स्टे कडील तीन गुन्हे तसेच कोतवाली पोलीस स्टेशनकडील एक गुन्हा उघडकीस आला आहे.

आरोपी आर सुधाकरण याने खरेदी केलेली वाहने ही त्यास कोणी दिली आहेत, अगर आरोपी आर सुधाकरण गाडया चोरी करताना होता का? याबाबत पोलीस तपास करत असून चोरी करणारे आरोपी हे तामिळनाडू व महाराष्ट्रातील आंतरराज्यीय आरोपी एकत्रित येवून लॅपटॉप मधील सॉफ्टवेअर वापरून कार अनलॉक करून स्विफ्ट व डिझायर कार चोरी करत असलेबाबत सांगितले आहे. आरोपी सध्या शिरूर पोलीस स्टेशनचे ताब्यात पोलीस कस्टडी मध्ये आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने मागील महिन्यात ५० चोरीच्या मोटार सायकल हस्तगत करत बारा आरोपींना अटक करून ३९ गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सदरची कारवाई ही मा पोलीस अधीक्षक अंकित गोयल ,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे , पुणे विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि महादेव शेलार, पोसई गणेश जगदाळे, सफौ. तुषार पंदारे, पोहवा सचिन घाडगे, पोहवा राजू मोमीण, पोहवा जनार्दन शेळके, पोहवा योगेश नागरगोजे, पोहवा अजित भुजबळ, पोहवा दिपक सावळे, पोहवा मंगेश थिगळे, पोना संदिप वारे, पोना अमोल शेडगे, पोना मंगेश भगत, पोकों अक्षय नवले, चापोकॉ अक्षय सुपे, पोका दगडु विरकर यांनी केली आहे.

 

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page