कृषीपुणेपुणे जिल्हाराजकारण

उच्च शिक्षित सूनबाईचे मार्गदर्शन अन् सासऱ्याने पारंपारिक शेतीला फाटा देत केला चिया शेतीचा यशस्वी प्रयोग घेतले लाखोंचे उत्पन्न

शिरूर तालुक्यातील तळेगावच्या शेतकऱ्यांची नवीन प्रयोग

तळेगाव ढमढेरे: ( वृत्तसेवा ) : शेतकरी प्रगतशील होत चालल्याने राज्यात शेतीचे अनेक वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. युवा शेतकरी अनेक नवीन प्रयोग शेतीत करतांना पहायला मिळत आहे. त्यात शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील एका शेतकऱ्याने चक्क आयुर्वेदिक पिकाची लागवड केली असून त्यातून त्याने एकरी लाखोंचे उत्पन्न मिळवत आहे. प्रगतिशील शेतकरी असलेल्या बाळासाहेब ढमढेरे यांनी त्यांच्या बी एससी एग्री झालेल्या सूनबाई आरती ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.

तळेगाव ढमढेरे ( ता शिरूर ) जि पुणे हे तशी मोठी बाजारपेठ असलेले गाव. बाळासाहेब ढम ढेरे यांची वडिलोपार्जित शेती. बाळासाहेब हे स्वतः प्रगतिशील शेतकरी असून त्यांनी शेतीत अनेक प्रकारचे प्रयोग करत पिके घेतली आहेत. त्यांच्या कुटुंबातील असणारी त्यांची सूनबाई आरती ही स्वतः बीएससी ॲग्री झालेली असून उच्च शिक्षित आहेत. शेतीचा चांगला अभ्यास त्यांना आहे. तेव्हा आपण शेतीत काय वेगळे करू शकतो. याचा विचार करून बाळासाहेब ढमढेरे यांनी त्यांच्या सूनबाईच्य मार्गदर्शनाखाली चिया शेतीचा प्रयोग करण्याचे ठरवले. त्यानंतर बाळासाहेब ढमढेरे यांनी धाडसी पाऊल उचलत जानेवारी महिन्यामध्ये एकरी दोन किलो चिया पिकाच्या बियाण्याची ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केली.

   विशेषतः रासायनिक खतांचा वापर पूर्णतः टाळून जैविक खतांचा वापर करून चियाची शेती फुलवली. कुठल्याही प्रकारची औषध फवारणी व तणनाशकाचा वापर या शेती उत्पादनात केला नाही. विशेषतः हे पीक आयुर्वेदिक असल्याने वन्यजीवांचा कोणत्याही प्रकारे उपद्रव होत नाही. पीक काढणीच्या दरम्यान या पिकाची पूर्णता पानगळती होत असल्याने जमिनीला खत म्हणून उपयोग होत होतो. जमिनीचा पोत सुधारण्यासही चांगलाच उपयोग होत आहे.

    पेरणीपूर्व मशागत, बियाणे,पेरणी, जैविक खत, पाणी मजुरी, खुरपणी, काढणी मजुरी, मळणी आदी कामांसाठी एकरी फक्त वीस हजार रुपये खर्च आला असून फारच कमी कष्टात अवघ्या सव्वातीन महिन्यात चिया पिकाचे उत्पन्न पाच ते सहा क्विंटल मिळाले आहे. साधारण पंधरा ते वीस हजार रुपये प्रति क्विंटलने व्यापारी शेतावर हे पीक खरेदी करत असल्याने ढमढेरे यांना एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे चिया या पिकाच्या शेतीतून निव्वळ नफा ८० हजार रुपये झाल्याचे बाळासाहेब ढमढेरे यांनी सांगितले आहे.

या चिया पिकाचा उपयोग हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह आदी विविध रोगांवर चिया पीक वरदान ठरत असल्याने मार्केटमध्ये बाजारभाव या पिकाला अतिशय चांगला मिळत आहे. उच्च शिक्षित सूनबाईचे मार्गदर्शन आणि सासऱ्याने पारंपारिक उसाच्या शेतीला फाटा देऊन पहिल्यांदा केलेली चिया पिकाच्या शेतीचा भन्नट प्रयोग करून यशस्वी उत्पादन घेतले आहे.

कशी केली पेरणी..

   बाळासाहेब ढमढेरे यांनी पारंपारिक ऊस शेतीला फाटा देऊन प्रथमच चिया पिकाची शेती केली आहे. औरंगाबाद येथील हर्बल कंपनीकडून ५०० रुपये प्रति किलो दराने बियाण्याची खरेदी केली. लहान ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी यंत्राच्या माध्यमातून या पिकाच्या बियाण्याची पेरणी केली.
व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर ४०० ते ५०० रुपये प्रति किलो दराने बाजार भाव देऊन या पिकाची खरेदी करतात. चिया पिकाच्या खरेदी-विक्रीचे मार्केट मध्यप्रदेश या ठिकाणी आहे. हे पीक आयूर्वेदिक असल्याने याला सध्या मार्केट मिळू लागले आहे.

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page