पुणे: ( वृत्तसेवा ) : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पिंपरे आणि थोपटेवाडी तील नागरिकांची सकाळ दुःखाच्या घटनेने उजाडली. लोणंद येथे झालेल्या अपघातात या गावातील तीन तरुणांचा अपघाती मृत्यू झाला. तिन्ही तरुण हे वडिलांच्या हाताखाली आलेली. एकच कुटुंबातील आई वडिलांची एकुलते एक मूल ती होती. त्यामुळे थोपटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ओंकार संजय थोपटे ( वय २२) पोपट अर्जुन थोपटे ( वय २३)अनिल नामदेव थोपटे (वय २५) अस या अपघातात मृत्यू झालेल्या तिघा तरुणांची नावे आहेत.
या गावातील थोपटे कुटुंब हे सर्व सामान्य घरातील शेतकरी कुटुंबातील हे तरुण. काहींनी नुकतेच कॉलेज पूर्ण केले होते तर काही जण कॉलेजला जात होते. काही कामानिमित्त ते लोणंद या ठिकाणी गेले होते. मात्र घरी परतत असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला व त्यात तिघांचा जागेवर मृत्यू झाला. थोपटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
थोपटेवाडी ग्रामदैवत असलेल्या हनुमानाचा यात्रा उत्सव सुरू होता. मात्र मुले गेल्याची बातमी येताच संपूर्ण यात्रेवर शोककळा पसरली आहे. या घटनेने यात्रा थांबवण्यात आली. सर्व गाव थोपटे कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाले आहे. तिन्ही कुटुंबातील ही एकुलती एक मूल असल्याचे आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
लोणंद येथे मोठी बाजारपेठ असल्याने पुरंदर तालुक्यातील अनेक नागरिक येथे ये – जा करत असतात. पुरंदर तालुक्यातूनहे ठिकाणी जवळ असल्याने कामानिमित्ताने लोक जात असतात. हे तीनही तरुण कामनिमित तिकडे गेले होते. मात्र रस्त्याच्या एका वळणावर त्यांचा भीषण अपघात झाला आणि त्यात त्यांना आपले प्रमाण गमवावे लागले. लोणंद पोलीस घटना स्थळी पोहचले असून त्यांनी मृत देह ताब्यात घेतले आहेत.