दौंड (वृत्तसेवा ): हातवळण ता- दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस व कात्रज जिल्हा दूध संघाचे माजी संचालक नानासाहेब फडके यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराचा तीव्र झटक्याने निधन झाले आहे.
नानासाहेब फडके यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना जवळील केडगाव येथील खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले होते मात्र परिस्थिती नाजूक असल्याने त्यांना लोणी येथे हलवण्यात आले उपचारादरम्यान फडके याना मृत्य झाल्याचे सांगण्यात आले .नानासाहेब फडके यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखाना संचालक ,कात्रज पुणे जिल्हा दूध संघ संचालक,हातवळण गावचे माजी सरपंच म्हणुन काम पाहिले होते. तसेच नानासाहेब हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी आमदार रमेश थोरात यांचे निकटवर्तीय होते.हातवळण गावचे माजी सरपंच व दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सागर फडके, हातवळण गावचे सरपंच योगेश फडके यांचे वडील होते .नानासाहेब फडके यांचा मागे पत्नी,मुले,पुतणे,सुना,विवाहित मुली,नातवंडे असा परिवार होत. नानासाहेब फडके यांचा निधनाने दौंड तालुक्यात शोककळा पसरलेली आहे.