पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रराजकारण

टाकळी हाजी येथील युवकाचे अखेर लेखी आश्वासना नंतर चौथ्या दिवसी उपोषण मागे

गावठाण हददीतील अतिक्रमणा काढण्यासाठी केले होते उपोषण

टाकळी हाजी : ( वृत्तसेवा ) : साबळेवाडी ( टाकळी हाजी ) ता शिरूर येथील गावठाण जमीनी वरील अतिक्रमण काढण्यासाठी उपोषणाला बसलेले युवा कार्यकर्ते संतोष साबळे यांना सहाय्यक गटविकास अधिकारी राम जगताप यांनी दहा दिवसात अतिक्रमण काढण्यांचे लेखी आश्वासन दिल्यानंतर चौथ्या दिवसी माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते ज्युस घेऊन उपोषण मागे घेण्यात आले .
साबळेवाडी येथील गावठाण जमीनी मधे चार व्यक्तीनी साडे सहा एकर क्षेत्रावर अतिक्रमण करून ताब्यात घेतले आहे . तसेच जुने घरे रस्ते स्मशानभुमी परीसरात अतिक्रमण केले आहे . गावठाण जागेत कांदा चाळीसह डांळीब कांदा व इतर शेतमालाचे उत्पादन घेत आहे . हे अतिक्रमण ऐवढे आहे की एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास स्मशान भुमीकडे जायला सुद्धा रस्ता या लोकानी ठेवलेला दिसत नाही .हे अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी युवा कार्यकर्ते संतोष मोहन साबळे गेली चार दिवसा पासुन उपोषणाला बसले होते .
आज चौथ्या दिवसी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी राम जगताप, विस्तार अधिकारी आर आर राठोड यांनी प्रत्येक्ष भेट देऊन प्रशासनाच्या वतीने दहा दिवसात उपोषण मागे घेण्यांचे लेखी आश्वासन दिले त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले . या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, उद्योजक दिलीप सोदक, बाजार समितीचे माजी संचालक सावित्रा थोरात, सरपंच अरुणा घोडे, उपसरपंच गोविंद गावडे, ग्राम विकास अधिकारी राजेंद्र खराडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या वेळी उपोषणकर्ते संतोष साबळे म्हणाले की, दहा दिवसात दिलेल्या आश्वासना प्रमाने अतिक्रमण मागे घेण्यात आले पाहीजे अन्यथा पुन्हा उपोषण करण्यात येईल .
गावात मोठ्या प्रमानात अतिक्रमणे झालेले असुन, साबळे यांनी उपोषण सुरु केल्यानंतर सामान्य माणसाने मोठा पांठीबा दिला .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page