कृषीपुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रराजकारण

कात्रज दुध संघाचा कारभार महीलेच्या हाती, उत्पादन क्षमतेत होणार दुप्पटीने वाढ

अध्यक्ष केशरताई पवार यांची माहीती

पुणे ( वृत्तसेवा ) : पुणे जिल्हा दुध संघाने उपपदार्थ निर्मिती मधे दुप्पट क्षमतेने वाढ होणार असुन, प्रथचं एक महिला अध्यक्षाने उत्कृष्ठ काम करीत केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे .

      पुणे जिल्ह्यातील कात्रज दूध संघ सुमारे दिड ते सव्वा दोन लाख लिटर सरासरी दुध जिल्ह्यातील प्रत्येक गावातील शेतक-याचे दुध संकलीत करुन ते बाजारपेठेत आणणारा हा एकमेव सहकारी संघ असून वर्षभरापूर्वी संघाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून केशरताई पवार यांनी पदभार घेतला आणि त्यावेळी अध्यक्षपदाच्या पहिल्याच भाषणात त्यांनी संघाची उत्पादन क्षमता दुप्पट करणार व पारदर्शक कारभार करणार म्हणून घोषणा केली होती. त्या प्रमाणे एनडीडीबीच्या पाच कोटी एवढ्या सवलतीच्या कर्जातून (२० टक्के दुध संघाचे भागभांडवलासह) नवीन उत्पादन क्षमता वृध्दीची मशिनरी त्याच जागेत बसविली आहे.

यामुळे आता दही, श्रीखंड-आम्रखंड, आईस्क्रिम, ताक कुल्फी, कुल्फी-कॅंडी, सुगंधी दुध आदी उपादनाची क्षमता एप्रिल-२०२३ अखेरपासून दुप्पट होणार असून ग्राहकांची मागणीही यामुळे पूर्ण होणार असल्याची माहिती कात्रज दूध संघाच्या अध्यक्षा केशरताई पवार यांनी दिली.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील एकुणच बाजारपेठेतील कात्रज उत्पादनांचे बॅंड स्थान हे पहिल्या पाचमध्ये असून नवीन प्रकल्पातील नवीन पॅकींग मशिन्स, प्रॉडक्ट पाश्चरायझर, क्रिम सेपरेटर, क्रीम पॅकींग, फ्रीजर, ताकाचे हायस्पीड पॅकींग मशिन यामुळे हे स्थान तर आणखीनच अग्रस्थानी जावून बाजारपेठेतील सर्वात मोठे दुध बाय प्रॉडक्ट पूरवठादार म्हणूनही कात्रजची ओळख निर्माण होणार असल्याची माहिती केशर पवार यांनी  दिली.

सदर नवीन प्रकल्पाचे सादरीकरण पुढील दोनच दिवसात विरोधीपक्षनेते अजित पवार यांचेपुढे करणार असून त्यानंतर या प्रकल्पाचे अधिकृत उद्घाटन तसेच नवीन प्रकल्प कार्यान्वित करण्याची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचे केशर पवार यांनी सांगितले.

पुणे जिल्हा दुध संघाचा नवीन ५ कोटींचा दुग्धजन्य उपपदार्थ निर्मितीचा नवा प्रकल्प या महिनाअखेर पूर्ण होवून याच उन्हाळी सिझनमध्ये कार्यान्वित होत आहे. सध्याची उप्तादन क्षमता दुप्पट करणा-या या नव्या प्रकल्पाची अंतीम चाचणी सुरू आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकल्पाबाबत ज्यांचे मार्गदर्शन लाभले आहे, त्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रकल्पपूर्णत्व अहवाल माहिती लवकरच सादर करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 अनेक खर्चावर नियंत्रण. ..

मागील वर्षी संघाची वकील फी दिड कोटी रुपये तर यावर्षी केवळ १७ लाख एवढा झाला. अनावश्यक दिसल्याने कंत्राटी कामगार संख्या ७० ने कमी केली. दुध वाहनांना जीपीएस सिस्टीम कार्यान्वित केल्याने बोगस किलोमिटरची चोरी थांबविली व जादा बिलांची आकारणी पूर्ण बंद केली. या सर्वांचा फायदा गतवर्षाच्या निव्वळ नफ्यात दिसणार असून त्याचीही माहिती अजित पवार यांना आपण येत्या प्रकल्प सादरीकरणाच्या बैठकीत देत असल्याचे केशरताई पवार यांनी सांगितले.

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page