गुन्हेपुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रराजकारण

सरपंचांना संपवणाऱ्या मुख्य आरोपीला केल जेरबंद ; शिरगाव येथे रंगला होता हत्येचा थरार

मावळातील दुर्देवी घटना

पुणे ( वृत्तसेवा ) : मावळ ( जि पुणे ) तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची चार दिवसांपूर्वी भर चौकात कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणी आता मुख्य आरोपींना शिरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत माहीती अशी की,विशाल उर्फ किरण सुनील गायकवाड (वय २५), संदीप उर्फ अण्णा छगन गोपाळे (वय ३१) आणि ऋतिक शिवाजी गोपाळे (वय २२) सर्व राहणार शिरगाव, अशी मारेकऱ्यांची नावे आहेत. यापैकी विशाल गायकवाड हा गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. अद्याप या हत्येचे मूळ कारण समोर आले नाही.

शनिवारी ( दि.१) रोजी शिरगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच प्रवीण गोपाळे यांची प्रतिशिर्डी साई बाबांच्या मंदिरासमोर कोयत्याने वार करून क्रूरतेने हत्या करण्यात आली होती. प्रवीण गोपाळे राष्ट्रवादीकडून सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले होते. काही महिन्यांपूर्वी शिरगाव ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली होती.

गोपाळे हे प्लोटिंगचा व्यवसायही करत होते. त्यातून ही हत्या झाली का याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. १ एप्रिल रोजी रात्री शनिवारी सव्वानऊच्या दरम्यान प्रवीण गोपाळे हे आपल्या दुचाकीला टेकून मित्राशी बोलत होते. हे प्रवीण गोपाळे असल्याची शहानिशा करण्यासाठी या आरोपींनी काही वेळ त्यांची रेकी देखील केली होती. त्यानंतर अचानक आरोपी आरोपी विशाल, संदीप आणि ऋतिक यांनी दुचाकीवर त्यांच्या जवळ येऊन त्यांच्यावर कोयत्याने हलला चढवला. त्यानंतर सरपंच जे जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. मात्र हल्लेखोरानी त्यांच्या तोंडावर सपासप वार केले आणि त्यांची हत्या केली. घटनेनंतर तिन्ही आरोपी दुचाकीवरून पसार झाले होते. त्यांना पहाटे तीनच्या सुमारास शिरगाव पोलिसांनी तिघेही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने मावळ तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page