गुन्हेपुणेपुणे जिल्हाशैक्षणिकसामाजिक

शिरूर येथे कुत्रा चावल्याने मुलाचा मृत्यु

मोकाट कुत्र्यांचा होतोच लहान मुलावर जीवघेना हल्ला

शिरुर ( वृत्तसेवा )
शिरूर जि पुणे (जोशीवाडी )येथील महादेवनगर येथे राहत असलेल्या पवन स्वप्नील यादव वय ८ या विद्यार्थ्याला कुत्राने चावा घेतला व त्यात तो मृत्युमुखी पडला .
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार महादेवनगर येथे राहणा – या स्वप्नील यादव यांच्या मुलगा पवन हा रविवारी अत्यवस्थ झाल्याने त्याला उपचारासाठी पुणे येथील नायडु दवाखान्यात नेण्यात आले होते तिथे उपचारा दरम्यामान त्याचे सोमवारी ३ एप्रिलला निधन झाले पवन याला काही दिवसापुर्वी कुत्र्याने चावा घेतला होता .
व तो शहरातील आरएमडी प्रशालेत इयत्ता दुसरीत शिकत होता पवन हा शहरातील प्रसिध्द डॉ . कै. आर .डी . यादव यांच्या नातू होता पवन यांच्या अकस्मित निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . अंत्यत शोकाकूल वातावरणात पवन यांचा अंत्यविधी शिरुर येथे झाला .
दरम्यान मागील काही वर्षा पासुन शिरुर शहरात भटक्या व मोकाट कुत्र्याचा प्रश्न गंभीर झाला असून शाळेचे विद्यार्थी ,ज्येष्ठ नागरीक व दुचाकीस्वार व महिला हे मोकाट कुत्र्यांचा त्रासाने त्रस्त आहेत भटक्या कुत्र्याचा संख्येवर नियंत्रण आणण्या बरोबरच त्याचे निर्बिजीकरण करणे , मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याबाबत सातत्याने मागणी करुन ही याबाबत फारसे काही होत नसल्याबद्दल नागरीक नाराजी व्यक्त करीत आहे .पवन यांच्या मृत्यु कुत्राने चावा घेतल्यामुळे झाल्याने शहर परीसरातील भटक्या व मोकाट कुत्र्याच्या बंदोबस्ताचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे .

डॉ विक्रम घावटे ( बालरोगतज्ञ ) –
कुत्र्याने अथवा मांजराने चावा घेतला अथवा ओरखडला नंतर तातडीने या संदर्भातील रेबीज प्रतिबंधक लस तातडीने घ्यावी . लस घेण्याबाबत चाल ढकल पणा करु नये . सरकारी दवाखान्यात ही लस मोफत उपलब्ध असते असे डॉ घावटे यांनी सांगितले त्याच बरोबर शिरुर शहरात वाढत असलेल्या मोकाट कुत्राच्या वावरा बद्दल चिंता व्यक्त करुन यावर तातडीने उपाय योजना करावी अशी मागणी ही केली .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page