पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईराजकारणसामाजिक

अशोक पवार आमदार कसा होतो ते बघतोच – अजित पवार

न्हावरे येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशाऱ्यांने मोठी खळबळ

न्हावरे ( प्रतिनिधी ) येत्या विधानसभेच्या निवडणुकीत अशोक पवार आमदार कसा होतो तेच बघतो आणि आपण जे बोलतो ते खरेच करतो असे खुले आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अशोक पवार यांना दिले आहे .
न्हावरे ( ता. शिरूर ) येथे शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की , घोडगंगा साखर कारखान्यासाठी तसेच तालुक्यातील विकासकामांसाठी जी मदत लागेल ती मदत मी आमदार अशोक पवार यांना केली आहे .याऊलट अजित पवार सरकारमध्ये असल्याने घोडगंगा कारखान्याला कर्ज मिळवण्यासाठी अडचणी येत असल्याने कारखाना सुरु करण्यास अडचण निर्माण झाली असल्याच्या खोट्या वल्गना आमदार अशोक पवार व त्यांचे समर्थक स्वतःचे पाप लपविण्यासाठी करत आहेत .मात्र जनता सुज्ञ आहे .ती त्यांना धडा शिकविल . सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचा घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद तर दुसऱ्या बाजूला ह्याचा आणि ह्याच्या मेहुण्याच्या मालकीचा व्यंकटेशकृपा साखर कारखाना कसा चालला आहे याचा जाब जनतेने अशोक पवारांना विचारावा असे सांगून अजित पवार म्हणाले की , मी पण जनतेला ह्याची औकात काय आहे हे खरे सांगेल . केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या शिफारशीनंतर घोडगंगा कारखान्याला एनसीडीसीच्या माध्यमातून
कमी व्याजदराने पैसा उपलब्ध होईल पण आमदार अशोक पवार , कारखान्याचे अध्यक्ष आणि संचालक मंडळाने यासंदर्भात कसलेच प्रयत्न केलेले नाहीत .
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की , खासदार अमोल कोल्हे यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात विकासाचे कसलेच काम केलेले नाही .ते नेहमी म्हणायचे मी सेलिब्रिटी आहे .अभियनाची तयारी करायची आहे , शुटिंग चालू आहे . दरम्यान यातच व्यस्त राहिल्याने त्यांना मतदारसंघातील जनतेला वेळ देता आला नाही . परिणामी शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांच्या माध्यमातून विकासकामे झाली नाहीत .याउलट माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गेल्या पाच वर्षात खासदार नसताना देखील हजारो कोटी रुपयांची विकासकामे शिरुर लोकसभा मतदारसंघात केलेली आहेत . जनतेशी सतत संपर्क ठेवून त्यांच्या अडीअडचणी व प्रश्न सोडविले आहेत .कांद्याची निर्यातबंदी उठविल्याने आता शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळणार आहे .तसेच दुधाची अनुदानाची रक्कमही दुध उत्पादकांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे . त्याचबरोबर चासकमानच्या कालव्याच्या लायनिंगचे काम न्हावरे उपजिल्हा रुग्णालय , सबरजिस्टर कार्यालय आदी कामे लवकरच मार्गी लागतील असे सांगून अजित पवारांनी लोकांनी भावनिक न होता विकासाच्या मुद्द्यांचा विचार करून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांना साथ द्यावी असे आवाहन केले .
यावेळी आमदार अमोल मिटकरी , श्रीगोंदा साखर कारखान्याचे संचालक श्रीनिवास घाडगे , बिरदेव शेंडगे यांची भाषणे झाली .
याप्रसंगी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर , माजी आमदार पोपटराव गावडे , प्रदीप कंद , जयश्री पलांडे , दादा पाटील फराटे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे , भाजपाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे , राहुल पाचर्णे , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र कोरेकर , भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते , स्वप्नील ढमढेरे , मंगलदास बांदल , बाबासाहेब फराटे, सुधीर फराटे ,गौतम कदम , अरुण तांबे , कमल कोकडे , अमोल कांगुणे , राजेंद्र जगदाळे , शशिकांत दसगुडे मोनिका हारगुडे , अनिल शेलार , गोविंद फराटे आदी मान्यवर उपस्थित होते .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page