पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रराजकारण

शिरूर तालुक्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आली भरती

अनेक पदाधिकारी अजित पवार गटात गेल्याने पवार गट भक्कम

न्हावरे : न्हावरे ( ता .शिरूर ) परिसरात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरात इनकमिंग चालू असून  मांडवगण येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिरूर पंचायत समितीचे माजी सभापती सिध्दार्थ कदम , माजी सरपंच कमल कोकडे , कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कांगुणे यांच्यासह अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे .
न्हावरे गाव हे शिरूर तालुक्यात राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. न्हावरे गाव आणि जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादी काँग्रेसचा नेहमीच बालेकिल्ला राहिलेला आहे . आतापर्यंत झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणूकांमध्ये न्हावरे जिल्हा परिषद गटांतून राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली मतांची आघाडी विजयासाठी नेहमीच निर्णायक ठरलेली आहे .
आठ महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर कार्यकर्ते संभ्रमावस्थेत होते दरम्यान इंदापूर येथे २५ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या शेतकरी मेळाव्यात पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे व भाजपचे सदस्य राजेंद्र कोरेकर , भूविकास बँकेचे संचालक , माजी सरपंच गौतम कदम , भाजपच्या युवा मोर्च्याचे उपाध्यक्ष दिनेश दरेकर , माजी उपसरपंच जयवंतराव कोकडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला . त्यनंतर ५ मार्चला मांडवगण येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या शेतकरी मेळाव्यात राजेंद्र कोरेकर यांच्या पुढाकाराने गोपाळ समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार , न्हावरे सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब खंडागळे , माजी उपसरपंच शहाजी पवार , दादासाहेब बिडगर , ग्रामपंचायत सदस्य उत्तम कदम , मोहन सरके , तात्याबा शेंडगे , विजया भोंडवे , रेणुका मारणे , भाजपचे दीपक कोकडे , इक्बाल शेख , अशोक गारगोटे ,किरण नवले , तुकाराम सोनवणे , हरिभाऊ खंडागळे , मोहन कोकडे , आनंदा कोकडे , महेंद्र कोकडे , किरण कोकडे ,राकेश गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे .
वरील राजकीय घडामोड आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिरुर तालुक्याच्या पूर्व भागात प्रभावी ठरणार असल्याची चर्चा लोकांमध्ये आहे .
न्हावरे येथील घोडगंगा सहकारी साखर कारखाना सद्या बंद आहे .त्याचा मोठा परिणाम येथील बाजारपेठेवर झाला आहे .तसेच कारखाना बंद असल्याने त्याचा मोठा फटका उस उत्पादक शेतकरी व कामगार वर्ग सहन करत आहे. .त्याचबरोबर चासकमानच्या आवर्तनाचे नियोजन कोलमडले आहे . या सर्व प्रश्नांवर तोडगा काढण्याचे तसेच विकास कामांसाठी भरीव निधी देण्याचे व पक्षातील कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले असल्याने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना साथ देण्याचे ठरविले आहे .दरम्यान न्हावरे जिल्हा परिषद गटातील आणखीन अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात करणार असल्याचे राजेंद्र कोरेकर यांनी सांगितले.

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page