टाकळी हाजी : राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या प्रयत्नांमधून राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये वडनेर ता .शिरूर येथील कुकडीनदीवरील पुलासह २६ कोटी चाळीस लाख रुपयांच्या विविध कामांना मंजुरी मिळाल्याची माहिती शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे व शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी दिली .
माजी आमदार पोपटराव गावडे व अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी सांगितले की शिरूर व पारनेर तालुक्याला जोडणाऱ्या वडनेर येथील कुकडी नदीवरील पुलाची अनेक वर्षापासून ग्रामस्थांकडून मागणी होत होती .हा पुल अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून यामुळे या भागातील दळणवळण सुकर होणार आहे .यासाठी वडनेर गावचे माजी चेअरमन बाबाजी निचित, माजी सरपंच बाबुराव निचित यांच्यासह ग्रामस्थांनी वेळोवेळी पुलासाठी निधी मिळावा हि मागणी केली होती, त्यानुसार राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी दहा कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आले आहे .
कवठे यमाई येथील यमाई देवीच्या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी मागील दौऱ्याच्या वेळेस रस्ता रुंदीकरणाची मागणी केली होती त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे .
तसेच रांजणगाव गणपती ते देवाची वाडी रस्त्यासाठी एक कोटी, म्हसे ते आण्णापूर या रस्त्यासाठी तीन कोटी रुपये ,करंदी ते चौफुला रस्त्यासाठी तीन कोटी रुपये, पिंपरखेड ते दाभाडे मळा या रस्त्यासाठी एक कोटी साठ लाख रुपये ,धामारी ते महादेव वाडी साळुंखे वस्ती रस्त्यासाठी ४० लाख रुपये ,पिंपरखेड ते जांबुत रस्त्यासाठी पाच कोटी रुपये ,तसेच म्हसे येथे कुकडी नदीवरील पुला पुला शेजारील रस्ता दुरुस्तीसाठी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे .
याशिवाय याशिवाय सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी इतर विविध निधीमधुन रस्ते ,सभामंडप, पुल , अंतर्गत रस्ते स्मशानभुमी दुरुस्त्या अशी मोठ्या प्रमाणात कामे घेतलेली असुन प्रगती पथावर असल्यांचे युवा नेते राजेंद्र गावडे यांनी सांगितले .