टाकळी हाजी : (वृत्तसेवा ) मलठण ता शिरूर जि पुणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी श्री रामचंद्र आनंदा गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे .
विद्यमान उपसरपंच दादासाहेब गावडे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक सरपंच अनुसया कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .यावेळी एकमेव गायकवाड यांचा अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली . यावेळी शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे ,घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे ,संचालक सुहास थोरात ,माजी पंचायत समिती सदस्य डॉ सुभाष पोकळे , सरपंच अनुसया कदम, पुणे जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत वाव्हळ,माजी सरपंच विलासराव थोरात माजी सरपंच माधुरी थोरात, माजी सरपंच शशिकला वाव्हळ माजी सरपंच राणीताई नरवडे माजी चेअरमन नाना माजी उपसरपंच दत्तोबा दंडवते ,मुकुंद नरवडे ,शशिभाऊ वाव्हळ , उदयोजक रामभाऊ गायकवाड,संदीप गायकवाड, युवा उद्योजक सागर दंडवते ,किरण शिंदे , योगेश कदम, चेअरमन चंद्रराव मावळे , माजी सरपंच दिपक रत्नपारखी सखाराम मावळे यांच्यासह ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते .
या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले की मलठण गावच्या विकासामध्ये आनंदराव गायकवाड यांचे मोलाचे योगदान असून त्यांनी वेळोवेळी गावच्या विकासासाठी समन्वयाची भूमिका घेत दुसऱ्यांना सरपंच करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला होता .त्यांचे चिरंजीव रामचंद्र गायकवाड यांच्या रूपाने त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला असून गावाच्या विकासासाठी हे कुटुंब सदैव प्रयत्नशील आहे . या वेळी राजेंद्र गावडे, डॉ सुभाष पोकळे यांनी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या .