पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिरूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाची शनिवार रविवार दोन दिवस जनस्वराज्य यात्रा

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा झंजावती दौरा

शिरूर (प्रतिनिधी ) : मिशन २०२४ अंतर्गत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने सुरु करण्यात आलेली जनस्वराज यात्रा शिरूर लोकसभा मतदार संघात शनिवार दि १६ रोजी शिवजन्म भुमी शिवनेरी येथुन सुरु करण्यात येणार असल्याची माहीती राष्ट्रीय समाज पक्षाचे लोकसभा प्रभारी सचिन गुरव यांनी सांगितले .
गुरव यांनी सांगितले की, शनिवार दि १६ रोजी सकाळी ८ वा. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली शिवनेरी येथे दर्शन घेऊन यात्रा सुरु होईल यामधे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव माऊली सलगर सहभागी होणार आहेत . ही यात्रा जुन्नर, नारायणगाव, मंचर, अवसरी, निरगुडसर, पारगाव शिंगवे ,लाखनगाव, पोंदेवाडी, धामणी, लोणी, वाफगाव, मार्गे खेड राजगुरूनगर, चाकण भोसरी दिघी, येरवडा,हडपसर, उंड्री लोणी कोळभोर
तसेच दिनांक रविवार दिनांक १७ रोजी थेऊर ,लोणी काळभोर कुंजीरवाडी ,सोरपतवाडी, तरडे, शिंदवणे, वळशी ,उरळीकांचन, खामगाव टेक दत्तवाडी भवरापुर, हिंगणगाव, शिंदेवाडी, अष्टापुर, पिंपरी बुर्केगाव , डोंगरगाव वाडेबोल्हाई केसनंद लोणीकंद पेरणेफाटा वरून शिरूर तालुक्यात प्रवेश करणार आहे .
कोरेगाव भिमा, वढु, केंदुर चौफुला पिंपळे जगताप, शिक्रापुर, वाघाळे, मलठण , आमदाबाद , कर्डीलवाडी , शिरूर, गोलेगाव, चव्हाणवाडी, निमोणे, निर्वी ,न्हावरे येथे सांगता सभा होणार आहे . या पत्रकार परीषदेसाठी पश्चिम महाराष्द अनु जाती जमाती आघाडी अध्यक्ष गणेश लोंढे, संपर्ग प्रमुख अंकुश देवडकर,पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार , शहर सचिव राजेश लवटे,शिरूर तालुका अध्यक्ष शिवाजी कुरहाडे, हडपसर विधानसभा अध्यक्ष बिभीषण देवकुळे, जुन्नर तालुका अध्यक्ष भाऊ घोडे, आंबेगाव तालुका अध्यक्ष योगेश धरम, खेड तालुका अध्यक्ष आण्णासाहेब नरुटे, हवेली तालुका अध्यक्ष भरत गडदे उपस्थित होते .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page