पुणेपुणे जिल्हाराजकारण

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे निधन

बापट साहेबाच्या रूपाने एक अभ्यासू विचारवंत राजकारणी हरपला

पुणे ( वृत्तसेवा ) खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे आज पुण्यात दुखःद निधन झाले. ते महाराष्ट्रातील भाजपच्या जेष्ठ नेत्यांपैकी एक होते. चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार, राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अशा विविध पदावर काम केले. पुणे शहरातील राजकारणात बापट यांची चांगली पकड होती. ते शहरातील मध्यवर्ती विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या कसबा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पुणे जिल्हा व राज्यात भाजप संघटन मजबुत करण्यास त्यांचे मोठे योगदान होते . जिल्ह्यात त्यांचे मोठ्या प्रमानात पक्ष व पक्ष विरहीत कार्यकर्ते चाहते आहेत . विकास कामात सर्वाना बरोबर घेऊन जिल्ह्यात विविध योजना राबविण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले . पुण्यांच्या विकासात त्याचे मोलाचे योगदान आहे .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page