पुणेमहाराष्ट्रमुंबईसामाजिक

हजारो रुग्नांना जिवनदान देणारे डॉ चोरे दाम्पंत्य गोरगरीबांचे देवदुत

पुणे जिल्हयातील शिरूरच्या डॉ चोरे दांपत्यांनी आरोग्य सेवेचे घेतले व्रत

शिरूर : रुग्ण सेवा हीच खरी जनसेवा हे ध्येय बागळून ३२ वर्षापूर्वी शिरूर मधे रुग्नसेवेचा श्रीगणेशा करणारे डॉ हिरामण चोरे व त्यांच्या पत्नी मनिषा या जोडीने आता पर्यन्त सर्पदंश ,विषबाधा व भाजलेल्या अति गंभीर हजारो रुग्णांना जीवनदान देत खऱ्या अर्थाने एक गोरगरीबांचा देवदूत म्हणून नाव लौकिक मिळविले आहे .

डोंगरगण ता शिरूर या खेडेगावात शेतकरी कुटुंबामध्ये डॉ हिरामण चोरे यांचा जन्म झाला. गावामध्ये शिक्षणाची सुविधा नसतानाही नदीतुन पोहुन जात वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन त्यांनी माध्यमिक शिक्षणानंतर व पुढे वैद्यकीय शिक्षणापर्यंत मजल मारली .लग्नानंतर त्यांना पत्नी मनिषा यांची खंबीर साथ मिळाली .सुरुवातीपासूनच गरिब परिस्थिती जाण असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये सदैव गोरगरिबांसाठी काहीतरी करण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती .यामधूनच त्यांनी शिरूर शहरांमध्ये स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात ज्या खोलीत यशवंतराव चव्हाणसाहेब राहिले त्याच खोलीमध्ये रुग्णसेवेचा प्रारंभ केला .आपल्याकडे आलेला रुग्ण कितीही गंभीर असला तरी बरा होऊन सुखरूप घरी गेला पाहिजे हा निर्धार त्यांनी सदैव जपला . त्यांच्या विश्वास व जिद्दीच्या बळावर हजारो रुग्णांना उपचारा बरोबरच मी आहे ना, नको काळजी करू या चार शब्दाचा मंत्र वापरत मानसिक आधार देत, त्यांनी हजारो रुग्नांचे आयुष्यात नव्यांने जगण्याची प्रेरणा दिली .

सर्पदंशावर रामबाण उपाय –
शिरूर तालुक्यामध्ये घोड,कुकडी भिमा यासारख्या नद्यांमुळे हा भाग सुजलम सुफलम झाले आहे .या नद्या सह्याद्रीच्या डोंगर रांगात उगम पावतात . येथे जंगलात असणारे नाग ,मन्यार ,घोनस ,फुरसे हे अति विषारी साप अति विषारी साप नदीच्या पुरामध्ये वाहून येतात त्यांचे प्रजनन झाल्यानंतर या भागात ते पसरले जातात .शेतीमध्ये काम करीत असताना पारनेर, शिरूर, श्रीगोंदा,आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना दंश करण्याच्या अनेक घटना घडल्या असुन त्यामधे अनेक लोकांचे प्राण गेले आहे .सर्पदंश झाल्यानंतर रुग्णाला लवकरात लवकर उपचार मिळणे गरजेचे आहे, मात्र पुणे हे अंतर जास्त असून तेथे जाई पर्यंत रुग्ण धोकादायक परिस्थितीमध्ये जातो , व जीव गमावतो .अशा वेळेस आपल्याच भागात आपणच या रुग्णांना सेवा देण्याचा निर्धार डॉ चोरे यांनी केला या क्षेत्रात जीव ओतून त्यांनी काम करीत आतापर्यंत हजारो रुग्णांना जीवनदान दिले .
साप चावल्याचे लक्षण –
याबाबत डॉ हिरामण चोरे यांनी सांगितले की , नाग ,फुरसे , घोनस चावल्यानंतर दोन दाताची खून दिसते, मात्र मण्यार चावल्यानंतर ही खून दिसत नाही . त्यानंतर रुग्णाला उलटी, मळमळ ,छातीवर दाब येणे ,घशाला सूज येणे ,तोंडातून लाळ गळणे ,फेस येणे ,डोळ्याच्या पापण्या जड होणे ,डोळे उघडता न येणे हे लक्षण दिसतात . हे लक्षण दिसल्यास नातेवाईकांनी रुग्णाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करावे .
त्याचबरोबर ज्या रुग्णांनी विषारी औषध प्राशन केले आहे , किंवा स्टोव्हचा भडका होऊन किंवा इतर कारणाने ७५ टक्या पर्यन्त भाजलेल्या रुग्णांनाही या ठिकाणी खात्रीदायक इलाज करीत जीवनदान देण्यांचे काम केले आहे .पुण्यासारख्या शहरातील अनेक मोठ्या रुग्णालयामध्येही ज्या रुग्णांना योग्य उपचार मिळाले नाही , रुग्न अति सिरीयस असल्यांने हे रुग्न जगु शकत नाही म्हणून घरी पाठविले अश्या रुग्नाना ही डॉ हिरामण चोरे व डॉ मनिषा चोरे यांनी आपल्या उपचार पद्धतीने बरे करण्याचे काम केले आहे .
त्याचबरोबर सीपीआर म्हणजे बंद पडलेले हृदय सुरू कसे करायचे या तंत्राचा वापर करून शंभर पेक्षा जास्त रुग्णांचे प्राण त्यांनी वाचवले आहे .कोविड काळामध्ये उत्तम काम करीत अनेकांना जीवनदान दिले .एक गोरगरिबांचा हक्काचा डॉ म्हणून आज शिरूर पारनेर श्रीगोंदा तालुक्यात डॉ हिरामण चोरे व डॉ मनीषा चोरे यांचा नावलौकिक आहे .बरे झालेले रुग्ण त्यांना भेटुन तुम्हीच आम्हाला हे जीवन पुन्हा दाविले म्हणतं कृतज्ञता व्यक्त करताना दिसतात . हिच आपल्या आयुष्यांची कमाई असल्यांची भावना डॉ चोरे दांपत्य व्यक्त करीत आहे .डॉ चोरे यांचा विविध पुरस्काराने गौरविण्यात आले असून त्यांचा सन्मान ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील , माजी मंत्री महादेव जानकर,माजी आमदार पोपटराव गावडे , उदयोगपती प्रकाश धारीवाल यांच्या शुभहस्ते झालेला आहे .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page