शिरूर: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणा साठी मुंबईकडे निघालेल्या मोर्चाला शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे जय मल्हार उद्योग समूहाच्या वतीने चहा पाणी व फराळाचे वाटप करून धनगर मराठा समाज एकीचे दर्शन घडवले .
ढोकसांगवी येथील युवा उद्योजक सचिन मलगुंडे व युवा उद्योजक सुहास मलगुंडे यांच्या जय मल्हार उद्योग समूहाच्या वतीने म्हणून जरंगे पाटील यांच्या भव्य रॅली साठी येणाऱ्या मराठा बांधवांसाठी पुणे नगर रस्त्यावर जय मल्हार ग्रुपच्या कार्यालयासमोर सकाळी स्वागत करीत मराठा बांधवांसाठी चहा नाश्ता व पराळाचीच व्यवस्था करण्यात आली होती .या ठिकाणी म्हणून जरांगे पाटील यांनी भेट देऊन मलगुंडे बंधूंचे कौतुक केले .तसेच शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटरावजी गावडे यांनी येथे भेट देऊन मराठा बांधवांना फराळाचे वाटप करीत मुलगुंडे बंधुच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या .पोपटराव गावडे यांनी या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा बांधवांची आपुलकीने चौकशी करीत ते कुठून आले आहेत, थंडीचे कपडे आहेत का, प्रवास कसा चाललाय असं म्हणत सर्वांची आस्थेने चौकशी करीत सवांद साधला . या बाबत जयमल्हार उदयोग समुहाचे सुहास मलगुंडे म्हणाले की, मानवता हाच खरा धर्म असुन महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज , पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांनी जातीभेद न मानता लोक कल्याणकारी राज्य या देशात केले . त्यांचा आदर्श घेत मराठा बांधव हे आपलेच सहकारी असून थंडी उन सहन करीत त्यांचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु आहे अश्या वेळेस आपण त्यांना मदत करणे आपले कर्तव्य समजून मदत केली पाहिजे .