टाकळी हाजी ( प्रतिनिधी ) आमदाबाद ता शिरूर येथील पुरातन महादेव मंदीरामधील कुलूप तोडुन पिंढीवरील पितळाचा नाग व समायाची चोरी दुर्दैवी घटना घडली आहे त्यामुळे या भागात चोर देवाला पण सोडेना अशी चर्चा रंगली आहे.
रविवारी सकाळी मंदीरात सोनु महाराज माशेरे पुजा करण्यासाठी गेले असता चोरीचा प्रकार झाल्याचे त्यांच्या निर्दशनास आले, त्यानंतर आमदाबाद गावचे माजी चेअरमन अशोकराव माशेरे यांना माहीती दिली .माशेरे यांनी तत्काळ टाकळी हाजी पोलिस चौकीच पोलिस उपनिरीक्षक अमोल पन्हाळकर यांना कळविले त्यानंतर पोलिस कॉन्टेबल दिपक पवार व सरपंच सोनाली थोरात यांनी पाहणी केली . पवार यांनी पंचनामा केला आहे .
आमदाबाद गावात घोडनदी किनारी या गावचे पवारराजे घराण्यांनी बांधलेले पुरातन शंभु महादेव मंदीर व नदीचा सुंदर घाट आहे .
या परीसरात सध्या मोठ्या प्रमानात चोऱ्या होत आहे . नदी किनारी असलेले शेती पंप ,मोटारी केबल चोराचे प्रमान वाढले असुन मोठ्या प्रमानात अर्थिक फटका बसत असल्यांने शेतकरी हतबल झाले आहे .
या पुर्वी कवठे येमाई (गांजेवाडी ) येथील मंदीरातही चोरी झाली होती . चोर पकडले, मात्र अद्यापही मुद्देमाल मिळाला नाही, त्यामुळे भाविक ग्रामस्थ नाराजी व्यक्त करीत आहेत . परीसरातील अनेक मंदीरात दानपेट्या चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत.
ग्रामस्थ व देवस्थान कमिटीनी मंदीर परीसरात सि सि टीव्ही कॅमेरे लावण्यांचे आवाहन शिरूरचे पोलिस निरीक्षक संजय जगताप , उपनिरीक्षक अमोल पन्हाळकर, सहाय्यक पो निरीक्षक सुनिल उगले यांनी केले आहे .