पुणेपुणे जिल्हाराजकारणसामाजिक

टाकळी हाजी गावच्या विकासासाठी चंद्रकांत साबळे यांचे योगदान महत्त्वाचे – पोपटराव गावडे

कुंड पर्यटन स्थळावर साबळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा

टाकळी हाजी : टाकळी हाजी गावच्या विकासासाठी चंद्रकांत साबळे यांनी समर्पित भावनेने दिलेले योगदान महत्वाचे असुन, त्यांची या भागातील विकासाची गंगा आणण्यास मदत झालेल्याचे प्रतिपादन शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केले .
टाकळी हाजी गावच्या जडणघडणीत व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व संपन्न आदर्श व्यक्तिमत्व माजी चेअरमन श्री चंद्रकांत आप्पा साबळे यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा कुंड पर्यटनस्थळ टाकळी हाजी येथे आयोजित करण्यात आला होता.
आप्पांनी आपले जीवन चार भावंडांचे तीस माणसाचे एकत्र कुटुंब सांभाळत सामाजिक कार्यात व गावच्या जडणघडणीत मोठे योगदान देऊन वेचले.समाजासाठी काम करणारी हिच तर खरी माणसे आहेत असे प्रतिपादन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील यांनी केले.
चंद्रकांत साबळे हे आयुष्यभर आपल्या कुटुंबाला न्याय देऊन टाकळी हाजी गावच्या विकासासाठी झटत राहिले. जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी एक एकर बागायती जमीन दान करून वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीत त्यांचे मोठे योगदान आहे.त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे निष्ठा जपली.अलीकडच्या काळात अशी माणसे कमी राहिली आहेत अशी खंत माजी आमदार पोपटराव गावडे यांनी व्यक्त केली .
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडूरंग पवार, अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी सभापती मधुकर उचाळे, माजी जिल्हा परिषद सदस्या सुनीताताई गावडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, शिवसेना नेते रामशेठ गावडे, सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त बाबाजी गावडे, पुणे मनपा माजी उपायुक्त हनुमंत नाझिरकर ,पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे, तज्ञ संचालक सोपानराव भाकरे, सतीश कोळपे, पारनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष भास्कर उचाळे, प्रभाकर गावडे, खंडूशेठ भाईक, सवित्राशेठ थोरात, माजी सरपंच दामूशेठ घोडे, टाकळी हाजी सरपंच अरुणाताई घोडे,शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते , रंगनाथ वराळ,माजी सरपंच बारकूशेठ भाईक,प्राचार्य आर.बी.गावडे, प्रभाकर खोमणे, रंगनाथ वराळ, अशोक माशेरे किसनराव आटोळे,विविध गावचे सरपंच ,चेअरमन ,मित्रपरिवार व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन समस्त साबळे परिवार ,आप्तेष्ट व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले.यावेळी मानपत्राचे वाचन श्री. संजय भाईक यांनी तर प्रास्ताविक संभाजी साबळे यांनी व सूत्रसंचालन लहू साबळे आणि आभार बाजीराव भाईक यांनी मानले .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page