अनाथ,दुर्लक्षीत बालकांना प्रोत्साहन देण्यासाठी सत्कार समारंभाचे आयोजन
पुणे, दि.२६ : महिला व बाल विकास विभागांतर्गत कार्यरत बालगृहातील अनाथ, दुर्लक्षीत बालकांना प्रोत्साहन देण्यासाठी बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई व महिला व बाल विकास विभाग, होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्यामार्फत येत्या बुधवारी २८ ऑगस्ट रोजी २५० बालकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड. सुशिबेन शहा व प्रमुख पाहुणे महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी बालगृहातील १० वी, १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, येरवडा येथे दुपारी १२ ते ३ या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. अनाथ, दुर्लक्षीत बालकांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत करण्यात आले आहे.