पुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ब्रम्हा-विष्णू-महेश याच्या रूपाने शिंदे – फडणवीस – पवार हे महादेव जानकर यांच्या पाठीशी; दोन लाख मतांपेक्षा अधिक मताधिक्याने जानकरांचा विजय निश्चित – माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर

महादेव जानकर यांना बाहेरचा उमेदवार म्हणणारे बंडू जाधव स्वतः लातूरचे - राहुल लोणीकर

सर्वसामान्य कुटुंबातील सुज्ञ, अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा उमेदवार जानकरांच्या रूपाने जनतेने निवडून जावा – आमदार लोणीकरांचे नागरिकांना आवाहन

माझी नाळ सर्वसामान्य लोकांशी जोडलेली परभणी लोकसभेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल – महायुतीचे परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांनी दिला

परभणी (प्रतिनिधी ) :परभणी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून आजपासून प्रत्यक्ष निवडणूक प्रचाराला सुरुवात झालेली आहे परभणी हा हिंदुत्ववादी विचारसरणीचा मतदारसंघ असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर यापूर्वीचे खासदार निवडून आलेले आहेत यावेळी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी मोदींच्या विचारसरणीचा आणि मोदींच्या बाजूने हात उंचावणारा खासदार निवडून देण्यासाठी परभणी लोकसभा सज्ज असून ब्रह्मा विष्णू महेश यांच्या रूपाने शिंदे फडणवीस आणि पवार परभणी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत त्यामुळे दोन लाख मतांपेक्षा अधिक मताने महादेव जानकर यांचा विजय होणार आहे अशा शब्दात माजी मंत्री आमदार श्री बबनरावजी लोणीकर यांनी महादेव जानकर यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला
परतूर येथे परभणी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ रेल्वे गेट परतुर ते आमदार लोणीकर यांचे जनसंपर्क कार्यालय अशी भव्य रॅली काढत ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आले रॅलीचा समारोप आमदार बबनराव लोणीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर झाला याप्रसंगी आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्या ला संबोधित करताना श्री लोणीकर बोलत होते यावेळी मंचावर महायुतीचे परभणी लोकसभेचे अधिकृत उमेदवार श्री महादेव जानकर भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री राहुल लोणीकर माजी आमदार विलासराव खरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंदराव चव्हाण राष्ट्रवादीचे नेते राजेश विटेकर शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र तौर जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल भाऊसाहेब गोरे रासप प्रदेशाची ओमप्रकाश चितळकर परभणी भाजपाचे नेते बाळासाहेब जाधव श्यामनाना उढान बळीराम कडपे अंकुश बोबडे कैलास शेळके डॉक्टर खटिंग चंद्रकांत कारके माऊली सरकटे यांच्यासह भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रासप मनसे रयत क्रांती संघटना रिपाई आठवले गट रिपाई कवाडे गट यांच्यासह महायुतीच्या सर्वच घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी पुढे बोलताना श्री लोणीकर म्हणाले की तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात परभणी लोकसभेच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले असून समाधान शिबिराच्या माध्यमातून तीन लाखापेक्षा अधिक नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचे काम केलेलं आहे परभणी लोकसभा हा विकासाच्या बाजूने कौल देणारा मतदारसंघ असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकळ करण्यासाठी निश्चितपणे महादेव जानकर यांच्या रूपाने सुज्ञ आणि अभ्यासू खासदार परभणी लोकसभेतील जनता निवडून देईल असा विश्वास लोणीकरांनी यावेळी व्यक्त केला
महाविकास आघाडी कडे कोणताही अजेंडा नाही विकास करण्याची कुठलीही मानसिकता नाही अशा विकृत आणि दिशाहीन असणाऱ्या महाविकास आघाडीला हद्दपार करण्याची वेळ आली असून प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या बूथपर्यंत सक्रियपणे सहभाग नोंदवत हे निवडणूक आपण स्वतः उमेदवार आहोत अशा पद्धतीने लढण्याची गरज आहे प्रत्येकाने आपण स्वतः उमेदवार असून माझ्या बुथवर कशी सर्वाधिक मताधिक्य देता येईल याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आपापल्या बुथची जबाबदारी घेत सर्वाधिक मतदान महादेव जानकर यांच्या “शिट्टी” या निवडणूक निशाणी समोर बटन दाबून अधिकाधिक मतांनी विजयश्री खेचून आणण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे यावेळी लोणीकर म्हणाले
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना महायुतीचे परभणी लोकसभेचे उमेदवार श्री महादेव जानकर म्हणाले की मी सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असून सर्वसामान्य नागरिकांशी माझी नाळ जोडलेली आहे परभणी लोकसभेतील नागरिकांची सेवा करण्याची संधी शिंदे फडणवीस पवारांनी दिली असून नक्कीच या संधीचं सोनं करणार आहे सर्वसामान्य परभणीकरांच्या भल्यासाठी सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे अजित दादा पवार यांच्या नेतृत्वात निश्चितपणे प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे महादेव जानकर यांनी यावेळी सांगितले
माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मराठवाडा वॉटर बीडच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले होते परंतु महाविकास आघाडीच्या सरकारने या मराठवाडा वॉटर ग्रीडला खेळ बसवली व परिणामी मराठवाड्यातील उद्योग शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला आज परभणी शहराला भीषण पाणीटंचाई असून दहा वर्षापासून खासदार असणाऱ्या व्यक्तीने याकडे अक्षम्य दुर्लक्ष करावे ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे देखील यावेळी महादेव जानकर म्हणाले वंदे भारत ट्रेन च्या माध्यमातून परभणी लोकसभेला भारताच्या नकाशावर आगळेवेगळे स्थान निर्माण व्हावे व त्याच्या निर्मितीसाठीचा कारखाना परभणी लोकसभा कार्यक्षेत्रात निर्माण व्हावा यासाठी भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करणार असून त्यानिमित्ताने परभणी लोकसभेतील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे महादेव जानकर यावेळी म्हणाले

महादेव जानकर यांना बाहेरचा उमेदवार म्हणणारे स्वतः लातूरचे – राहुल लोणीकर
भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री राहुल लोणीकर यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी बोलताना राहुल लोणीकर यांनी बंडु जाधव यांचे नाव न घेता टीका केली बंडू जाधव आणि त्यांचे चेलेचपाटे सर्व सामान्य जनतेमध्ये भ्रम निर्माण करत असून महादेव जानकर यांना बाहेरचा उमेदवार असल्याचे सांगत आहेत परंतु खरे पाहता बंडू जाधव यांना असे सांगण्याचा अजिबात अधिकार नाही कारण ते स्वतः परभणी लोकसभा कार्यक्षेत्रातले नसून लातूरचे आहेत हे कदाचित ते विसरले असतील अशा शब्दात राहुल लोणीकर यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा समाचार घेतला

बंडु जाधव हा डुप्लिकेट माणूस – बंडु जाधव यांचे सख्खे भाऊ बाळासाहेब जाधव यांचा बंडू जाधव घणाघात*
बंडु जाधव हा अत्यंत डुप्लिकेट माणूस असून वरून कीर्तनातून तमाशा अशी परिस्थिती आहे वारीला जाऊन ढोंग करणारा आणि सर्वसामान्य जनतेची फसवणूक करत केवळ आणि केवळ दादागिरी करणारा खासदार बंडु जाधव यांना यावेळी जागा दाखवायची असून जो स्वतःच्या सख्या भावाचा होऊ शकला नाही तो सर्वसामान्य जनतेचा काय होईल अशा शब्दात बंडू जाधव यांचे सख्खे भाऊ बाळासाहेब जाधव यांनी खासदार बंडू जाधव यांचा समाचार घेतला
यावेळी माजी आमदार विलासराव खरात माजी आमदार अरविंदराव चव्हाण राजेश विटेकर भाऊसाहेब गोरे मोहन अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल लोणीकर यांनी यावेळी गणेशराव खवणे रमेश भापकर माऊली शेजुळ राजेश मोरे जिजाबाई जाधव शत्रुघ्न कणसे सतीशराव निर्वळ उदयसिंह बोराडे कृष्णा सोळंके अंकुशराव बोबडे कैलास शेळके गणेशराव बोराडे बंडू घारे विठ्ठलराव बोरकुले अमोल सुरंग संपत बनगवडे आसाराम साबळे अजय रंधे प्रसादराव गडदे विलास घोडके बंडू मानवतकर विक्रम उफाड विकास पालवे गजानन उफाड प्रमोद भालेकर कानोबा थोरात गणेश घारे कैलास केंदळे संतोष आखाडे विक्रम धुमाळ सुनिता देशमुख हरिराम माने शहाजी राक्षे विलास आकात विश्वजीत खरात नर्सिंग राठोड गजानन राजबिंडे गणपतराव वारे विक्रम माने संभाजी वारे प्रवीण सातवणकर प्रकाश चव्हाण कृष्णा आरगडे गजानन लोणीकर दिगंबर मुजमुले गणेश सोळंके अशोकराव बुरकुले हरिराम माने शहाजीराक्षी मधुकर मोरे बबलू सातपुते बाबाराव थोरात माणिक राठोड सिताराम राठोड अर्जुन राठोड तुकाराम सोळंके रवी सोळंके विठ्ठल बिडवे रामदास घोंगडे हनुमान चिखले विश्वंभर शेळके कैलास चव्हाण शिवाजी पाईकराव राजेंद्र वायाळ माधव जनकवार तानाजी शेंडगे कोंडीराम राठोड संदीप बाहेकर ज्ञानेश्वर जैन सोपा जाईल बालाजी सांगोळे अमर बगडिया दया काटे डॉक्टर स्वप्नील मंत्री अजित पोरवाल नरेश कांबळे मुजू कायमखानी मलिक कुरेशी सरफराज कायमखाने भगवान पाटोळे राहुल काळे सुधाकर बिरगुडे भास्कर कुलवंत गणेश राव खैरे महादेव काळे डॉक्टर शरद पालवे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page