महाराष्ट्रमुंबईराजकारण
जनता दल सेक्युलरचा महायुतीला पाठिंबा – नाथाभाऊ शेवाळे यांची माहिती
महायुक्ती होणार अधिक भक्कम

मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मुंबईतील सागर या निवासस्थानी भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी नाथाभाऊ शेवाळे यांनी महायुतीच्या उमेदवारांना जनता दल सेक्युलर पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते विजयासाठी प्रयत्न करतील असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
भेटी दरम्यान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दूरध्वनी द्वारे पाठिंब्याबाबत चर्चा केली. तसेच शेवाळे यांनी याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व मंत्री गिरीष महाजन, महायुतीचे समन्वयक प्रसाद लाड यांच्याशी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली होती.
यावेळी या शिष्टमंडळात प्रधान महासचिव अजमल खान, सरचिटणीस निलेश कंतारिया, संजय बारवकर, ॲन्ड बापूसाहेब देशमुख हे पदाधिकारी उपस्थित होते.