पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबई

न्हावरे गावच्या सरपंच अलका शेंडगे यांना दिलासा

न्हावरे : न्हावरे ( ता.शिरूर ) येथील सरपंच अलका बिरा शेंडगे यांना सरपंच व सदस्य पदावरून काढून टाकण्याच्या विभागीय आयुक्त व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिलेल्या आदेशास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने सरपंच अलका शेंडगे यांना मोठा दिलासा मिळाला आहे .
न्हावरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच कविता बिडगर यांनी दुसऱ्या ग्रामपंचायत सदस्याला उपसरपंच पदाची संधी मिळावी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता .मात्र सरपंच अलका शेंडगे राजकीय व्देषबुध्दीने संबंधित राजीनामा मंजूर करण्यास टाळाटाळ करून उपसरपंच पदाची निवडणूक घेण्याचे टाळतात .दरम्यान सरपंच शेंडगे आपल्या सरपंच पदाच्या कर्तव्यापासन दूर जात असल्याचा ठपका ठेवून त्यांच्या विरोधात माजी सरपंच कमल कोकडे , ग्रामपंचायत सदस्य रेणुका मारणे , कविता बिडगर , विजया भोंडवे , संध्या कदम , उत्तम कदम , तात्याबा शेंडगे , सुभाष कोकडे , समीर कोरेकर यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती . वरील ग्रामपंचायत सदस्यांच्या तक्रारीवरुन १८ जुलै २०२३ रोजी तत्कालीन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सरपंच अलका शेंडगे यांना पदावरून हटविण्याचा आदेश दिला होता .दरम्यान विभागीय आयुक्तांनी दिलेल्या या आदेशाच्या विरोधात सरपंच अलका शेंडगे यांनी ग्रामविकास मंत्री यांच्याकडे २५ जुलै रोजी अपील दाखल केले होते .त्यावर विभागीय आयुक्तांच्या आदेशाला ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून सात महिने स्थगिती मिळाली होती . दरम्यान २२ फेब्रुवारी २०२४ ला ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विभागीय आयुक्त यांचा आदेश कायम ठेवून अलका शेंडगे यांना सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदावरून काढून टाकण्याचा आदेश दिला होता . या आदेशाच्या विरोधात सरपंच अलका शेंडगे यांनी २ मार्चला मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती . त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये विभागीय आयुक्त पुणे यांनी १८ जुलै २०२३ रोजी दिलेल्या आदेशास व २२ फेब्रुवारी २०२४ ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी पारित केलेल्या आदेशास स्थगिती देण्यात आली आहे . मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे न्हावरे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक रद्द करण्यात आली असल्याचे उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी तहसीलदार शिरूर यांना कळविले आहे .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page