पुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मंचरच्या अजित पवारांच्या सभेत चर्चा राजेंद्र गावडेच्या जोरदार शक्तप्रर्दशनाचीच

शिरूरच्या बेट भागाचा मंचर मधे बोलबोला

मंचर ( वृत्तसेवा ) : शिरूर तालुक्याचे युवा नेते राजेंद्र पोपटराव गावडे यांनी मंचर येथे झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेप्रसंगी हजार गाड्यांचा ताफ्यासह, ढोल ताश्याच्या गजरात राजेंद्र गावडे यांची जल्लोशात झालेली एंट्री शिरूर आंबेगावात चर्चेची ठरली आहे .
शिरूर तालुक्यातील माजी आमदार पोपटरावजी गावडे यांच्या नेतृत्वाखाली बेट भाग हा नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे .राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापाल झाल्यानंतर माजी आमदार पोपटराव गावडे यांनी मागेपुढे न पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांची पाठराखण करीत त्यांना खंबीर साथ दिली .त्यानंतर प्रथमच शिरूर आंबेगाव विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांची जाहीर सभा मंचर येथे काल झाली .त्या ठिकाणी पोपटराव गावडे यांच्या बालेकिल्ल्यातून किती समर्थक कार्यकर्ते उपस्थित राहणार या कडे सर्वांचे लक्ष लागले होते .मात्र पोपटराव गावडे यांच्या पाठीमागे युवा नेते राजेंद्रदादा गावडे व जिल्हा परिषद माजी सदस्य सुनीताताई गावडे यांनी जिल्हा परिषद गट पिंजून काढीत कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले . प्रत्येक गावात झालेली प्रचंड विकास कामे या मुळे लोकामधेही मोठा उत्साह होता .त्यामुळे न भूतो न भविष्यते अशाप्रमाणे प्रत्येक गावातून गाड्यांचा प्रचंड ताफा वाजत गाजत टाकळी हाजी येथे येत होता . सकाळी ११ . ३० वा बेट भागातील सर्व गाड्या टाकळी हाजी येथे एकत्र झाल्यानंतर राजेंद्रदादा गावडे यांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घोषणांनी टाकळी हाजी गाव दणाणुन गेले होते .गाड्यांचा ताफा आमदाबाद येथे पोहोचल्यानंतर शेवटची गाडी टाकळी हाजी येथे रांगेत होती . त्यानंतर आमदाबाद मलठण कवठे येमाई सविंदने येथील कार्यकर्त्यांच्या गाड्या यामध्ये एकत्र येत होत्या .या ताब्यामध्ये सुमारे साडेआठशे ते हजार गाडीने अष्टविनायक महामार्ग जाम केला होता .त्यामुळे अनेक तास वाहतुक कोंडी झाली होती .मंचर येथे आगमन झाल्यानंतर जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढीत घोषणांनी मंचर निनादन सोडले .मंचर येथे झालेल्या या सभेत गावडेच्या जोरदार एंट्रीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांचे ही लक्ष वेधले .अजित पवार यांनी राजेंद्र गावडे यांना बोलून घेत त्यांचे कौतुक केले .अजित पवार यांची मांडवगण येथे जाहीर सभा सकाळी झाल्यानंतर माजी आमदार पोपटराव गावडे यांना हेलिकॉप्टर मध्ये सोबत घेत मंचर येथे आले या वेळी शिरूर तालुक्यातील विविध प्रश्न बाबत चर्चा करीत सोडवण्याची ग्वाही अजित पवार यांनी दिल्याचे गावडे यांनी सांगितले .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page