टाकळी हाजी : स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाबरोबरच बाह्य ज्ञान अवलोकन करावे तसेच दर्जेदार शिक्षण महत्वाचे असल्याचे प्रतिपादन प्रा डॉ शरद पारखे यांनी केले .
आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जांबुत ता -शिरूर जि. पुणे विद्यालयात इयत्ता 12 वी विज्ञान विदयार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अळकुटी चे प्राचार्य डॉ. शरद पारखे उपस्थित होते. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शिवाजी हरिभाऊ जगताप, संस्थेचे मार्गदर्शक उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, संस्थेचे सचिव डॉ जयश्रीताई जगताप ,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गणेश गुंजाळ, विद्यालयाचे शिक्षक प्रा. सोपान ठुबे , प्रा. सौ.वैशाली म्हस्के , प्रा.अविनाश परंडवल , प्रा.सौ.अश्विनी सोनवणे प्रा. प्रतीक बेलोटे ,प्रा. मुन्ना मणियार,आदर्श माध्यमिक व इंग्लिश स्कुल चे सर्व शिक्षक व शिक्षेकतर कर्मचारी उपस्थित होते.डॉ पारखे सरांनी विदयार्थ्यांना भविष्यकाळात येणाऱ्या नवीन संधी व विविध क्षेत्रामध्ये होणारे बदल,रोजगारच्या संधी याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.तसेच नवीन शैक्षणिक धोरण कसे असेल व भविष्यात निर्माण होणाऱ्या संधी याबद्दलही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच अध्यक्षानी विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.प्राचार्य गुंजाळ सर यांनी विदयार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन धर्य, चिकाटी व मेहनत या त्रिसूत्री चा अंगीकर केल्यास यशाचे शिखर गाठू शकता याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.तनुजा सोनवणे, साहिल येवले, जयेश जगताप, निकिता जोरी या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केल्या.प्रा. सोपान ठुबे सरांनी शिक्षण म्हणझे विदयार्थ्यांची शिदोरी आहे असे सांगितले, सर्व शिक्षकांनी मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमचे सूत्रसंचालन श्रीम मनीषा शिस्तार यांनी केले व आभार विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक प्रा. संदीप डेरे यांनी केले.