टाकळी हाजी : ( वृत्तसेवा ) टाकळी हाजी ता शिरूर येथे हजारो महिलांच्या उपस्थितीत रंगलेल्या हळदीकुंकू समारंभात सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या पत्नी किरणताई वळसे पाटील यांनी महिलांशी संवाद साधत खेळ पैठणीच्या कार्यक्रमात रंगत भरली .
अनुसया महिला उन्नती केंद्र यांच्या वतीने टाकळी हाजी येथे बापूसाहेब गावडे विद्यालयात टाकळी हाजी – कवठे यमाई जिल्हा परिषदेतील गटातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे संयोजन जिल्हा परिषद सदस्य सुनिताताई गावडे व माजी नगराध्यक्ष मनिषाताई गावडे यांनी केले . हळदी कुंकू कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच या भागातील महिलांना सुनिता गावडे व मनिषाताई गावडे यांनी गावोगाव जाऊन निमंत्रण दिल्याने मोठ्या प्रमाणात महिलांनी उपस्थिती लावत कार्यक्रमाला गर्दी केली होती . गर्दीने शाळेचे मैदान फुलून गेले होते .यावेळी महिलांसाठी खेळ पैठणीचा हा खेळ हा कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमात किरणताई वळसे पाटील यांच्यासह सुनीताताई गावडे मनिषाताई गावडे यांनी गाव गावच्या सरपंच महिला पदाधिकारी यांनी सहभाग घेतला . या वेळी किरणताई वळसे म्हणाल्या की, महिलांनी चुल व मुल या गोष्टी पलीकडे जाऊन जीवनाचा आनंद घेतला पाहिजे . आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी कामाचा ठसा उमटविला असुन, पुरुषांच्या बरोबरीने त्या काम करीत आहेत . पालकांनी मुलीनाही चांगले उच्चशिक्षित करून स्वतःच्या पायावर उभे केले पाहिजे . विधवा महिलांनाही समाजाने मान सन्मान देण्याची गरज असल्यांचे प्रतिपादन किरणताई वळसे पाटील यांनी केले .जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे यांनी उपस्थित महिलांचे स्वागत केले . या वेळी विधवा महिला तसेच महिला उद्योजिका यांचा सन्मान किरणताई वळसे यांच्या हस्ते करण्यात आले . ग्रामविकास संस्थेचे सचिव राजेंद्र गावडे यांनी किरणताई यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला . खेळ पैठकीचा कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निलेश पडवळ यांनी केले . आभार संविदण्याच्या सरपंच शुंभागी पडवळ यांनी मानले .
या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी ही तर सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील व माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केलेल्या कामाची पावती असल्याची प्रतिक्रिया या उपस्थित महिलांनी व्यक्त केली .