पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रराजकारण

विविध कार्यकारी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

कान्हुर मेसाई सह शिरूरच्या पश्चिम भागात ना वळसे पाटील यांनी केले शेकडो कामांचे उद्घघाटन व भुमिपुजन

टाकळी हाजी दि. २२ : विविध कार्यकारी सहकारी पतसंस्था ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना, नागरिकांना पतपुरवठा करण्यात महत्वाची भूमिका बजावत असल्याने या संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

शिरूर मधील कान्हूर मेसाई येथे कान्हूर मेसाई विविध सहकारी संस्थेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन व भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या निधीतून बांधण्यात आलेल्या स्वागत कमानीचे उद्घाटन प्रसंगी श्री. वळसे पाटील बोलत होते. या सह मिडगुलवाडी करंदी परीसरातील विविध विकास कामाचा शुभारंभ सहकार मंत्री वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर आंबेगाव तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पांचुदकर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, राजेंद्र गावडे विश्वास कोहकडे, माजी उपसभापती सविता परहाड, माजी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांच्यासह सहाय्यक निबंधक अरुण साकोरे संस्थेचे विविध संस्थेचे चेअरमन , विविध गावचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य, गावातील नागरिक उपस्थित होते.

कान्हूर मेसाई विविध सहकारी संस्थेचे कामकाज अतिशय चांगले होत असून संस्था नफ्यात आहे. संस्थेने स्वतःच्या निधीतून ३४ लाख रुपयांचा निधी नवीन इमारतीसाठी जमा केला असल्याचे सांगून श्री. वळसे पाटील म्हणाले, आज सहकार क्षेत्रात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होताना दिसत आहेत. अनेक संस्था चुकीच्या पद्धतीने कामे केल्याने आर्थिक अडचणीत आल्या आहेत. असे प्रकार टाळण्यासाठी संस्थेच्या संचालक मंडळाने पारदर्शक कामे करावीत.

शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून पीक कर्ज, मध्यम मुदतीचे कर्जाचे वाटप होत आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जुनी बँक आहे. १९९० साली या बँकेच्या साडेतीनशे कोटी ठेवी होत्या त्या आता १२ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. बँकेचे कामकाज अतिशय सुस्थितीत चालले आहे. त्याच धर्तीवर विविध कार्यकारी सहकारी संस्थेचेदेखील कामकाज सुस्थितीत चालणे गरजेचे आहे. ही समाजाची संस्था असल्याने ती टिकली पाहिजे.

केंद्र शासनाने त्यांच्या उद्योग धोरणात १५२ प्रकारचे विविध व्यवसाय करण्याची परवानगी विविध कार्यकारी सहकारी संस्थांना दिली आहे. संस्थानी नागरिकांना कर्ज वाटप करण्याबरोबरच या व्यवसायात उतरून आर्थिक सक्षम व्हावे,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी मिडगुलवाडी येथील नव महिला उत्पादक गटांनी तयार केलेल्या वस्तूंची श्री. वळसे पाटील यांनी पाहणी केली.

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page