गुन्हेपुणेपुणे जिल्हामुंबई
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा ३ युनिटने मोटार सायकल चोरांना केलं जेरबंद
तीन मोटार सायकली सह एक लाख दहा हजाराचा मुद्देमाल ताब्यात
पिंपरी : पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखा ३ च्या युनिटने मोटार सायकल चोरांना जेरबंद करीत आळंदी दिघी परिसरातील गुन्हे उघडकीस आणले आहेत .
याबाबत माहिती अशी की गुन्हे शाखा युनिट 3 कडील पोहवा सानप, पोलीस अंमलदार राम मेरगळ, कोळेकर, जैनक, काळे असे दिघी पोलीस ठाणे हददीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना कोळेकर व मेरगळ यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, भरत तिवारी मोरे वय 23 वर्षे रा. मु.पो.मोरेवाडी ता. आंबेजोगाई जि.बिड हा चोरीतील मोटर सायकल विक्री करीता खडी मशिन रोड दिघी येथे येणार आहे असले बाबत खात्रीशीर माहीती मिळाली असता वरील नमुद पथकाने मोटर सायकल सह आरोपी नामे भरत तिवारी मोरे वय 23 वर्षे रा. मु.पो.मोरेवाडी ता. आंबेजोगाई जि.बिड यास सीआरपीसी 41 (1)(ड) प्रमाणे ताब्यात घेवून त्याचेकडे सखोल चौकशी केली असता त्याने दिघी, आळंदी हददीत गुन्हे केल्याची कबुली देवून त्याचेकडून 03 मोटर सायकली असा एकुण 1,10,000 /- रुपयेचा मुददेमाल हस्तगत करुन खालील प्रमाणे 03 गुन्हे उघडकीस आणले आहेत
सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 3 पिंपरी चिंचवड वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश गायकवाड साहेब पोलिस हवलादार विठल सानप, पोलिस अमलदार योगेश्वर कोळेकर,राम मेरगळ, समीर काळे ,सागर जैनक, महेश भालचीम, सचिन मोरे . त्रिनयन बालसराफ यांनी केली आहे.