पुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रराजकारण

शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाला वसंतराव काणे आदर्श पुरस्काराने सन्मानित

तिर्थ क्षेत्र माहुर येथे संपन्न झाला सन्मान सोहळा,पुणे विभागात शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ ठरला आदर्श

   शिरूर ( वृत्तसेवा ) : पत्रकारीते बरोबरचं सामाजिक कार्यात उल्लेखनिय काम करणाऱ्या शिरूर (जि पुणे ) तालुका मराठी पत्रकार संघाला पुणे विभागिय पातळीवर जेष्ठ पत्रकार वसंतराव काणे आदर्श पत्रकार संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील तिर्थ  क्षेत्र माहूर (ता. किनवट ) येथे शनिवार दि.१३ रोजी पत्रकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी महाराष्ट्र राज्यात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन जिल्हा पत्रकार संघांना रंगाअप्णा वैद्य व आठ तालुका पत्रकार संघांना वसंतराव काणे आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले.पुणे विभागातून आदर्श तालुका पत्रकार संघ म्हणून शिरूर तालुका मराठी पत्रकार संघास जेष्ठ पत्रकार वसंतराव काणे आदर्श पत्रकार संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्षम तालुका अध्यक्ष संजय बारहाते यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले . या वेळी जेष्ठ पत्रकार नितीन बारवकर यांच्यासह तालुक्यातील सदस्य यांनी पुरस्कार स्विकारला .
संपूर्ण जागतिक स्तरावर कोरोना महामारीचे भीषण संकट ओढवले असताना बहुसंख्य गोरगरीब जनेतेला रोजगारा अभावी उपासमारीचा सामना करावा लागला होता.याप्रसंगी आपले सामाजिक कर्तव्य समजून शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते व सहकारी यांनी जिवाची पर्वा न करता एक हात मदतीचा हा उपक्रम सुरु केला . कोरोना संकटाने अडचणीत सापडलेल्या, दोन वेळच्या जेवणाचीही सुविधा उपलब्ध नसणाऱ्या कुटूबीयांना जिवनावश्यक वस्तुचे मोफत वाटप केले.जिवघेणा कोरोना आजार झालेल्या रुग्णांना उपचारासाठी वेळोवेळी मदत करून आधार देण्याचे काम केले.पत्रकार संघाच्या या समाज उपयोगी कार्यामुळे कोरोना असर कमी झाल्या नंतर समाजातील विविध स्तरातील संघटनांनी तसेच समाज घटकांकडून पत्रकार संघाचे कौतूक करण्यात आले होते. वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, यांच बरोबर व अनेक उपक्रम संघाने राबविले . पत्रकार संघाच्या याच कार्याची दखल राज्य स्तरावर पत्रकार परिषदेने घेऊन शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार शिरूर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक नितीन बारवकर ,कार्यक्षम तालुका अध्यक्ष संजय बारहाते, समन्वयक पोपटराव पाचंगे,सतिष धुमाळ,धनंजय तोडकर ,नवनाथ रणपिसे,युन्नुस तांबोळी,सिकंदर तांबोळी ,धर्मा मैंड,शरद राजगुरू,महादेव साकोरे, गणेश थोरात ,मारुती पळसकर अमिन मुलाणी, यांनी पुरस्कार स्विकारला .
यावेळी किनवट माहूरचे आमदार भिमराव केराम,भाजपाचे समन्वयक व स्वागताध्यक्ष रामदास सुमठाणकर ,मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख,राष्ट्रीय अध्यक्ष शरद पाबळे,विश्वस्त किरण नाईक, मिलींद अष्टेकर, विजय जोशी, पुणे जिल्हाध्यक्ष सुनिल लोणकर ,सी एन न्युज च्या ब्युरो चिफ  विजया देशपांडे,नांदेड जिल्हा अध्यक्ष गोवर्धन बियाणी,माहूर तालुका अध्यक्ष सर्फराज दुसाणी ,आदी मान्यवरांसह महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून आलेले पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्यक्षम अध्यक्ष संजय बारहाते म्हणाले की , पत्रकार संघाने पत्रकारीते पुरते काम न करता आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने समाजातील कोविड सह अनेक आवश्यक त्या प्रसंगा मधे धावून जात एक हात मदतीचा हा उपक्रम राबविला आहे . त्यामुळे हा पुरस्कार मिळाला असुन संघ सदैव आपले काम जोमाने पुढे चालु ठेऊन या पुरस्कारामुळे तालुक्यातील सर्व सदस्यांची उर्जा निश्चित वाढली असुन हा पुरस्कार मी माझ्या सर्व सदस्यांच्या कामाची पावती मानतो . हा पुरस्कार मिळाल्या बद्दल सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे ,आमदार अशोक पवार, माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर आंबेगाव तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष मानसिंग पांचुदकर पाटील यांनी अभिनंदन केले .

आपले राज्य

सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक, कृषी, औद्योगिक घडामोडीचे माहीती देणारे एक हक्काचे व्यासपीठ आपले राज्य न्युज होय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page