टाकळी हाजी ( वृत्तसेवा ) : आजोबा नातवंडे खेळवत असतात .. अचानक एका शाळेतील जुन्या मित्रांचा फोन येतो … अरे आपल्याला सर्वाना शाळेत जमायचंय – सर्व वर्ग मित्र जमणार आहेत तु पण ये . एका फोनने सारं विचारचक्र बालपणातील त्या आठवणीचा वेध घेऊ लागतं . रात्र भर त्यांच आठवनीनं अखेर तो दिवस उजेडतो पुन्हा तब्बल ३७ वर्षानी शाळा भरते ती आजी आजोबाची ..
घोड, कुकडी नदीच्या मधील टाकळी हाजी सह १० – १२ गावाचं बेट वसलेलं. पावसाळा आला की चार महिने या भागातील लोंकाचा जगाशी संपर्ग तुटायचा . पावसाळ्यापुरते धान्य साठा सरकार येथील गोडाऊन मधे साठऊन ठेवायचं तेव्हा कुठे सालचंदीचा प्रश्न सुटायचा . येथे चौथी नंतर चार अक्षरे गिरवायची म्हटलं तरी शाळा नाही ना आरोग्याच्या सुविधा . या भागात सन १९६२ मधे पोपटराव गावडे यांच्या रुपाने तरुण नेतृत्व राजकारणात उदयास आले . चानाक्ष बुद्धी असलेल्या या तरुणाने राजकीय पटलावर आपले नाव सिद्ध करीत तालुका पातळीवर काम करीत असताना त्यांनी भागातील शिक्षणाची गंगा आणायला सुरवात केली शाळा सुरु करण्यासाठी प्रयत्न करीत गावोगाव सातवी पर्यन्त शाळा सुरु झाल्या . त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी सन १९८२ – ८३ मधे टाकळी हाजी येथे ग्रामविकास शिक्षण संस्थेचे रोपटे लावले . त्याच विद्यालयातील सन१९८४-८५ बँचचे माजी विद्यार्थी तब्बल ३७ वर्षानी जमले होते . शिक्षण राजकारण शेती पोलिस वैद्यकीय क्षेत्रात राज्यातील विविध भागात काम करणारे हे सारे आता मात्र आजी – आजोबा झाल्यानतरच प्रथम भेटतं होते .
टाकळी हाजी येथे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने युवा नेते राजेंद्र गावडे यांच्या संकल्पनेमधुन गेट टुगेदर घेण्यात आले.यावेळी परिसरातून प्रभातफेरी काढून पूर्वीचा परिसर व आज बदल झालेले गाव याचे दर्शन घेत शाळेत परिपाठ राष्ट्रगीत घेत सर्व त्या काळातील शिक्षकांनी परिपाठ व वर्गात हजेरी घेतली त्यावेळी वर्गातील वातावरणाची अनुभूती मिळाल्याचे व समाधान मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. अनेक वर्षातून भेट झाल्याने विद्यार्थ्यांनी मनसोक्त गप्पा,गोष्टी,गाणी,ओळख परेड स्नेहभोजण असे कार्यक्रम करत आनंद लुटला. त्या काळातील शिक्षक कैलास फापाळे,फकीर तांबोळी, कोंडिबा कुंभार,, सिताराम गायकवाड, तुकाराम फंड, दिलिप इचके या शिक्षकांचा मानपत्र देवून सन्मान करण्यात आला यावेळी प्राचार्य आर बी गावडे, माजी प्राचार्य प्रभाकर खोमणे, कवठे येमाईच्या सरपंच सुनिता पोकळे, शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते,व्हाइस चेअरमन साहेबराव लोखंडे, खंडू जाधव, पत्रकार संघाचे कोकण विभाग संपर्गप्रमुख विजय थोरात, भरत घोडे, मच्छिंद्र देवकर, व माजी विद्यार्थी उपस्थित होते.
शिक्षकांनी मनोगत व्यक्त करत प्रशासन अधिकारी शिवाजी बोखारे,बाबा दिक्षित, रविंद्र पाटील, दस्तगिर मोमीन, फुलाबाई गावडे, या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र गावडे यांनी सूत्रसंचालन प्रविण गायकवाड यांनी नियोजन धोंडीभाऊ जाधव ,प्रविण गुगळे व विद्यार्थ्यांनी केले.आभार सदाशिव पवार यांनी मानले.