शिरूर : शिरूर पोलीसांची धडाकेबाज कारवाई करीत ३ गावठी पिस्तुल सह तीन आरोपीना जेरबंद करण्यात यश मिळविले आहे .
या बाबत शिरूर पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी पत्रकार परीषदेत माहीती दिली त्यानुसार दि.३१ डिसेंबर २०२३ रोजी पोलीस निरीक्षक जगताप यांना त्यांचे विश्वसनिय बातमीदारामार्फत बातमी प्राप्त झाली की, मध्यप्रदेश येथुन निखिल एकनाथ चोरे रा. डोंगरगण, ता. शिरूर, जि.पुणे हा शिरूर एस.टी.स्टँड येथे येणार असुन त्यावेजवळ १ गावठी बनावटीचे पिस्तुल व ४ राऊंड आहेत. मिळालेल्या बातमीवर कारवाई करणेकामी पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सापळा पथक तयार करून पंचांना पाचारण करून बातमी मिळाले ठिकाणी सापळा रचुन मिळालेल्या बातमीप्रमाणे शिरूर एस टी स्टैंड समोरील मोकळया जागेतुन बातमीमधील इसमास ताब्यात घेवुन त्याचेजवळील बॅगमधुन २५,४००/- रू. किंमतीचे १ गावठी बनावटीचे पिस्तुल, ४ जिवंत राऊंड व एक निळे रंगाची बॅग असा मुद्देमाल जागीच जप्त करून आरोपीविरूध्द शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१४१९/२०२३ भा.ह.का.क. ३,२५ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अटक आरोपी निखील एकनाथ चोरे याचेकडे अटके दरम्यान चौकशी केली असता, आरोपीत याने सदरचे पिस्तुल व जिवंत राऊंड उमरटी, मध्यप्रदेश येथुन आणल्याचे सांगितले असुन त्याचेसोबत विकास बाबाजी चोरे व शुभम सुरेश चोरे यांनी देखील त्यांचेकडील चारचाकी गाडी मधे जाऊन उमरटी, मध्यप्रदेश येथुन २ पिस्तुल व ६ राऊंड आणल्याचे सांगितल्याने आरोपी विकास बाबाजी चोरे व शुभम सुरेश चोरे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी करून त्यांना गुन्हयात अटक करून त्यांचेकडुन ५०,८००/- रू. किंमतीचे २ पिस्तुल, ६ जिवंत राऊंड तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेली गाडी नं. जप्त करण्यात आली आहे ..
सदर गुन्हयात एकूण ७६,२००/- रू. किंमतीचे गावठी बनावटीचे एकुण ३ पिस्तुल व १० जिवंत राऊंड असे आरोपी १) निखिल एकनाथ चोरे वय २० रा. डोंगरगण, ता. शिरूर, जि.पुणे २) विकास बाबाजी चोरे वय २२ वर्ष, रा.सदर ३) शुभम सुरेश चोरे वय २० वर्ष, रा. सदर यांचेकडून हस्तगत करण्यात आले असून त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकित गोयल (भा.पो.से.),अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर उपविभाग यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक शिरूर पोलीस स्टेशन संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप यादव, अमोल पन्हाळकर, पोसई सुनिल उगले, एकनाथ पाटील, सहा फौज गणेश देशमाने, पो.हवा.परशराम सांगळे, पो.ना. नाथसाहेब जगताप, पो.अं.रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, सचिन भोई, अर्जुन भालसिंग, दिपक पवार यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई एकनाथ पाटील करीत असुन तीनही आरोपीत यांना मा.न्यायालयाने दि.०४/ जानेवारी २०२४ रोजी पर्यतची पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलेली आहे.