टाकळी हाजी ( वृत्तसेवा ) जांबुत तालुका शिरूर येथील शेतकरी कुंटुबातील तरुणी विजयमाला बाबाजी गाजरे – फलके या तरुणीची पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्यांने तिचे सर्व स्तरामधुन कौतुक होत आहे .
नुकत्यांच लागलेल्या राज्यराज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये विजयमालाचे नाव जाहीर झाले आहे . विजयमाला हिचे प्रार्थमिक शिक्षण जिल्हा परीषद प्राथमिक शाळा जांबुत तर माध्यमिक शिक्षण जयमल्हार हायस्कुल मधे झाले . ११ वी १२ वी श्री दत्त विद्यालय पिंपरखेड येथे पुर्ण केले त्यानंतर त्यांचा विवाह जांबुत येथील ओतुर येथे मंडल अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले विजय रामभाऊ फलके यांच्याशी सन २०११ रोजी झाला, मात्र काहीतरी उच्च पदस्थ होण्यांचा ध्यास त्यांचा सदैव होता . लग्नानंतरही त्यांनी शिक्षणात खंड न पडु देता पुढील शिक्षण पुणे विद्यापिठामधुन बहिस्थ ( बाहेरून ) घेत पुर्ण केले . त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली सन २०१८ मधे त्यांची निवड मंत्रालयात क्लार्क म्हणुन झाली . परंतु ध्येय मोठे असल्याने त्या तेथे हजर झाल्या नाहीत . त्यांनी सन २०२० मधे पी एस आय परीक्षेचा अभ्यास सुरु केला . मात्र कोविड काळात दोन वेळा पुर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या . त्यानंतर झालेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन त्यांमधे विजयमाला हिने बाजी मारली आहे . या काळात तिचे पती विजय फलके , डॉ फलके आई, वडील व कुंटुबांने मोलाची साथ देत अभ्यासासाठी प्रेरणा दिली . विजयमाला यांची निवड झाल्या बद्द्ल त्यांचा सन्मान सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील व माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या वतीने युवा नेते राजेंद्रदादा गावडे यांनी केला .या वेळी पंचायत समितीचे माजी सदस्य वासुदेव जोरी, सरपंच दत्ता जोरी, उपसरपंच राणीतई बोराडे, माजी सरपंच बाळासाहेब फिरोदिया, बाळकृष्ण कड, बाबाशेठ फिरोदिया ,बाबाजी बबन गाजरे, बाळासाहेब बदर,नाथाभाऊ जोरी,देविदास पवार,माऊली सरोदे, डॉ श्रीकांत फलके, सदस्य सुभाष जगताप , दिनेश गाजरे, सुखदेव गाजरे ,पोपट सरोदे यांच्यासह मोठ्या प्रमानात ग्रामस्थ उपस्थित होते .