क्रीडापुणेपुणे जिल्हामहाराष्ट्रमुंबईशैक्षणिकसामाजिक
हृदयरोग टाळण्यासाठी सर्वांनी आरोग्याची वेळ तपासणी करा – डॉ खरपुडे
शिरूर येथे पत्रकारांची केली आरोग्य तपासणी
शिरूर : ( वृत्तसेवा ) हृदयरोग टाळण्यासाठी टाळण्यासाठी सर्वांनी सकस आहार , व्यायामाबरोबरचं वेळेवर आरोग्य तपासणी करणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ.अभिजीत खरपुडे यांनी व्यक्त केले.
शिरुर येथे मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी डॉ. खरपुडे बोलत होते.या शिबिरात ६१ पत्रकार बांधवांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
येथील मातोश्री मदनबाई माणिकचंद धारिवाल हॉस्पिटलच्या विशेष सहकार्याने आयोजित केलेल्या या शिबिरात रुबी हॉल क्लिनिकच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोग्याची तपासणी केली यासाठी रुबीचे प्रशासन अधिकारी संजय तांदळे , डॉ वंदना सागवेकर यांनी विशेष सहकार्य केले .
मराठी पत्रकार संघांचे संस्थापक नितीन बारवकर व शहराध्यक्षा दिपाली काळे यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, संस्थापक अध्यक्ष नितीन बारवकर, अध्यक्ष संजय बारहाते, शहाराध्यक्षा दिपाली काळे ,माणिकचंद हॉस्पिटलच्या डॉ.वंदना सागवेकर, डॉ.दीपा देशमाने आदिसह पत्रकार बांधव उपस्थित होते. या वेळी परीषदेचे अध्यक्ष शरद पाबळे म्हणाले की शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ आदर्श काम करीत असल्यांने त्यांना आदर्श पत्रकार संघ पुरस्कार जाहीर झाला असुन, पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांच्या नेतृत्वा खाली संघाने राज्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम केले आहे . पुरस्कार हि या कामाचीच पावती असुन पुढेही जोमाने काम करीत समाजातील विविध घटकाना साठी काम करावे असे आवाहन त्यांनी केले .
रुबी क्लिनिकचे डॉ.अभिजित खरपुडे, डॉ.शगुप्ता बागवान, डॉ.सुहास शेजल यांनी तपासणी करत मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन पत्रकार संघाचे समन्वयक पोपटराव पाचंगे यांनी केले. आभार पत्रकार संघांचे तालुकाध्यक्ष संजय बारहाते यांनी मानले.
—————————————————————