टाकळी हाजी ( वृत्तसेवा)
सध्याच्या काळात मोबाईलमुळे अनेक नाते संपुष्टात आले आहेत,मुलांनी आई-वडिलांसोबतचे नाते दृढ करावे असे मत महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी व्यक्त केले.
टाकळी हाजी ता.शिरूर येथे मा.बापुसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे वसंत हंकारे यांचे बाप समजावून घेताना संघर्षाकडून यशाकडे या व्याख्यानाचे आयोजन विद्यालयाचे माजी विद्यार्थी विकास घोडे,पै.स्वप्निल गावडे,भरत घोडे,शरद घोडे यांनी केले होते. हंकारे यांनी आपल्या व्याख्यानात काही वेळ विद्यार्थ्यांना खळखळून हसवले तर नंतर अक्षरशः विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या डोळ्यातून पाणी आणले.
सध्याच्या युगात घडत असलेले अनेक किस्से त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडल्या.विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाटात प्रतिसाद देत त्यांना प्रोत्साहित करत होते.
निमित्त होते की,विद्यालयाचे सर्व माजी विद्यार्थी यामध्ये शिवनगर शाळेचे आदर्श शिक्षक बाळासाहेब घोडे गुरुजी यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा डॉ.कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक पुरस्कार,पुण्यनगरीचे पत्रकार विजय थोरात यांची राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड, ॲड.भरत खाडे यांची एल. एल.बी. पदवी प्रदान केल्याबद्दल, जेष्ठ पत्रकार वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाला मिळाल्या बदद्ल संघाचे अध्यक्ष संजय बारहाते यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे,संस्थेचे सचिव राजेंद्र गावडे,शिरूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मनिषा गावडे,घोडगंगाचे संचालक सोपान भाकरे,माजी उपसरपंच अजित गावडे,तुकाराम ऊचाळे,चेअरमन प्रश्नांत चोरे, शांताई उद्योग समूहाचे दिलीप सोदक, सोसायटीचे व्हाइस चेअरमन साहेबराव लोखंडे,पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन खंडू जाधव,संचालक बाबाजी रासकर,धोंडीभाऊ गावडे,योगेश भाकरे, दत्ताशेठ उनवणे,सोसायटीचे संचालक अक्षय वरखडे,माजी सदस्य धोंडीभाऊ जाधव, निवृत्त प्राचार्य प्रभाकर खोमणे,प्राचार्य आर.बी.गावडे,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार गावडे,राजेंद्र गावडे, आर.बी.गावडे यांचे भाषण झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी.एम.नीचित यांनी तर आभार एस.सी.गावडे यांनी मानले.