नाशिक ( वृत्तसेवा ) :काल नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय (१७ वर्षाखालील गट )खो-खो स्पर्धेमध्ये महाराष्टाच्या संघाने गुजरातचा पराभव करीत दणदणीत यश मिळवले असून महाराष्ट्र संघाचा भावेश अशोक माशेरे याची राष्ट्रीय खेळाडू म्हणून निवड झाली आहे .
काल नाशिक येथे महाराष्ट्र राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . भावेशच्या नेतृत्वाखाली जोरदार कामगिरी करत गुजरात संघाला धुळ चारली . भावेश यांनी चमकदार कामगिरी करीत आपली चुणूक दाखऊन दिली . भावेश हा पुणे येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी च्या भोसे येथील मॉडर्न हायस्कुलचा विध्यार्थी आहे . भावेश यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत असुन, राज्याचे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर आंबेगाव राष्ट्रवादीचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर , माजी सभापती प्रकाश पवार,डॉ गजानन एकबोटे, आमदाबादच्या सरपंच सोनाली थोरात यांनी भावेश यांचे अभिनंदन केले .